मोस्ट अवेटेड ‘पठाण‘ चित्रपट स्टारर शाहरुख खान सध्या खूपच चर्चेत आला आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग‘ हे गाणं प्रदर्शित होऊन वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत . त्यामुळे पठान चित्रपटावर बॉयकॉट ट्रेंड सुरु झाले आहे. पठान वरुन अनेक कलार आणि राजकारणी आपली प्रतिक्रिय देत आहेत, त्यापैकीच खासदार नवनीत राणा यांनी देखिल आपली प्रतिक्रिय व्यक्त केली आहे.
खासदार नवनीत राणा (Navneet Rana) या राजकारणी असून एकेकाळी अभिनेत्री देखिल होत्या. त्यांनी दक्षिणमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. नवनीत यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान भगव्या रंगाच्या बिकीनीवरुन निर्माण झालेल्या वादावर आपले मत व्यक्त केले आहे.
नवीनत राणा यांनी सांगितले की, “जर चत्रपटांमध्ये वाद निर्माण होत असेल आणि लोकांच्या भावना दुखवणारे दृष्य असेल, तर त्याला एडिट करुन पुन्हा प्रदर्शन करायला हवं. मला असं वाटतंय की, ज्या चित्रपटात रंगाचा गैरवापर केला गेला असेल आणि त्यामुळे देशातील लोकांच्य भावना दुखवल्या गेल्या असतील, तर सर्वप्रथम सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट पाहायला हवा. आणि वाद निर्माण होणारे दृश्य एटिड कारावे. कोणत्याही चित्रपटाला इतर गोष्टीवरुन बॉयकॉट करण्यापेक्षा वाद निर्माण होणारे दृष्य एडिट करुनच चित्रपट प्रदर्शित करायला हवा. कारण शेवटी सिनेसृष्टीतून मोठी आर्थिक उलाढाल होत असते. यामुळे देशाला आर्थिकरित्या आधार मिळतो.”
नवनीत यांनी पुढे सांगितले की, “मी देखिल या गोष्टीचा सकारात्मरित्याच विचार करतेय, पण मला असं वाटतंय की, कोणत्याही गोष्टीमुळे एखाद्याच्या भावना दुखावल्या जात असतील, तर त्यासाठी सेन्सॉर बोर्ड आहे. त्यांनी त्यांचे काम करायला हवं. आम्ही देखिल या गोष्टीचा सकारत्मक पद्धतीनेच विचार करत आहोत की, देशभरातील कलाकारांच्या चित्रपटांना बॉयकॉट करु नये. कारण त्यांचा आपल्या देशातील आर्थिक जडणघडणीत फार मोठा वाटा आहे.”
नवनीत राणा यांनी निर्माण झालेल्या वादाला पाठिंबाही दिला नाही आणि वादात सहभागी देखिल झाल्या नाही. त्यांनी खूप विचारपूर्वक त्यांचे मत वेयक्त केले. पठाण चित्रपट (दि, 25 जानेवरी 2023) रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ज्याच्यावर ठेवला विश्वास त्यानेच दिले चुकीचे उत्तर, स्पर्धकाने गमावले एवढे लाख
बोल्ड एँड ब्युटिफूल! जॅकलीनच्या लेटेस्ट फोटोशूटचा इंटरनेटवर राडा