Tuesday, March 19, 2024

नाद कारा पण…! पठाणने ‘दंगल’लाही पछाडलं, एका आठवड्यातच केली ‘एवढ्या’ कोटींची कमाई

शाहरुख खान स्टारर पठाणने पहिल्याच दिवशी अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. तब्बल 4 वर्षानंतर शाहरुख प्रेक्षकांच्या भेटीला आल्याने चाहत्यांचा आनंद गनात मावेनासा झाला असून सिनेमागृहाच्या बाहेर चाहत्यांनी ढोल-ताशा आणि फटाक्यांच्या गजरात चित्रपटाचं दणक्यात स्वागत केलं. बहुचर्चित चित्रपट पठाणची कथा एका भारतीय गुप्तहेराची आहे. असून यामध्ये दीपिका पादुकोण आणि अभिनेता जॉन अब्राहम यांच्या अभिनयाचे देखिल चाहते कौतुक करत आहेत. पठाणने प्रदर्शनानंतर बॉक्सऑफिसवर तबब्ल 20 चित्रपटांचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. अशातच चित्रपटाने हिंदी मरोंजनातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचाही रेकॉर्ड मेडीत काढला आहे.

मोस्ट अवेटेड पठाण (pathan) चित्रपट स्टारर शाहरुख खान (Shahrukh Khan) साठी प्रेक्षकांप्रती कमालीची क्रेज पाहायला मिळत आहे. पठाण वादात अडकल्यामुळे अनेक चाहत्यांनी चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी केली होती मात्र, पठाणने प्रदर्शनापूर्वीच चाहत्यांच्या मनात मोठं स्थान निर्माण केलं आहे. अशातच सर्वाधिक कमाई करणार हिंदी मनोरंजानामध्ये आमिर खान स्टारर दंगल चित्रपटाला मानलं जायचं मात्र, आता पठाणने पहिल्याच आठवड्यात ‘दंगल’चाही रेकॉर्ड मोडीत काढला आहे.

पठाणने बॉक्सऑफिसवर तब्बल 20 चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत, त्यामध्येच ‘बाहुबली 2’ (Bahubali) चाही समावेश आहे. पठाणच्या ॲडव्हान्स बुकिंगने ‘बाहुबली 2’ चाही रेकॉर्ड मोडला. अशातच पठाणने आता दंगल चित्रपटाचाही रेकॉर्ड मोडीत काढला आहे. दंगल चित्रपटाने 30. 70 मिलियन डॉलर्सची कामई केली हेती तर पठणने एका आठवड्यातच 31.40 मिलियनची डॉलर्सची कामई केली आहे. म्हणजेच चित्रपटाने दंगला चित्रपटापेक्षाही जास्त कामई केली आहे. पठाण हिंदी मनोरंजनमध्ये अजून कोणत्या चित्रपटांना मोडीत काढणार आहे हे पाहाणे खूपच महत्वचे ठरणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-

वैवाहिक आयुष्यात मिळालं नाही सुख, आता एकटीच राहतेय मानसी नाईक

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्न करून मुंबईत देणार ग्रँड रिसेप्शन

 

हे देखील वाचा