चंकी पांडेच्या भावाच्या मुलीची सोशल मीडियावर हवा, बिकीनीतील फोटोंवर पडतोय लाईक्सचा पाऊस


अभिनेता चंकी पांडे हा एकेवेळी बॉलीवूडमधील मोठा कलाकार समजला जात असे. आजही तो अनेक कॉमेडी सिनेमांत काम करताना दिसतो. परंतू आता या पांडे परिवारातील पुढची पिढीही सिनेमात उतरली आहे. चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे व चंकी पांडेचा भाऊ चिक्की पांडेची मुलगी अलाना पांडे सध्या बॉलीवूडमधील उगवते तारे आहेत. अनन्याची चर्चा तर सर्वत्र असतेच परंतू आता अलानाचीही चर्चा होऊ लागली आहे.

इंस्टाग्रामवर अलाना पांडे हिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे, आणि काही दिवसांपासून ती, तिच्या चाहत्यांसोबत आकर्षक फोटो शेयर करत आहे. अलीकडेच तिने इंस्टाग्रामवर, आपल्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेयर केले आहेत, जे खुप व्हायरल होत आहेत.

अलीकडे, तिच्या मालदीवच्या सुट्टीबद्दल चर्चेत असलेल्या, अलाना पांडेने नवीन फोटो शेयर केला आहे, जो चाहत्यांना खूप आवडला आहे.

जेथे अलाना पांडे हिने तिचे नवीन फोटोशूट केले आहे,तर फोटोंच्या शीर्षकात तिने लिहिले आहे की, ‘मी एक गुढ समुद्रकिनारा शोधत आहे.’

फोटोमध्ये अलाना समुद्राच्या किनाऱ्यावर वाळूमध्ये उभी असून, गुलाबी रंगाच्या बिकिनीमध्ये, खुल्या केसात  कमालीची दिसत आहे. तिचा हा फोटो, लाखो चाहत्यांनी पसंत केला आहे.

अलानाच्या या आकर्षक फोटोमध्ये, चाहत्यांची नजर तिच्यावर अक्षरशः खिळली आहे. कमेंट बॉक्समध्ये अलानाच्या लूकचे, कौतुक करण्यासाठी अनेक चाहत्यांची रांग  लागली आहे .

अलाना सेलिब्रिटी फिटनेस तज्ज्ञ डॅने पांडे आणि चिकी पांडे यांची मुलगी आहे. अलाना ही अनन्या पांडेची चुलत बहीण आहे.

अलानाला फिरायला खूप आवडते. ती वेगळ्या ठिकाणांना भेट देते. असे असले तरीही अलायाने आपले शिक्षणही पुर्ण केले आहे. तीने लंडन कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पुर्ण केले आहे. फॅन फॉलोईंग बद्दल बोलायचे झाले तर, ६लाख लोक अलानाला फक्त इंस्टाग्रामवर फॉलो करतात.

दुसर्‍या फोटोमध्ये, अलाना तिच्या कथित बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. फोटोमागील सुंदर निसर्ग फोटोला अजून शोभा आणत आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.