Saturday, September 30, 2023

हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज गायक मुकेश यांच्या १०० व्या जयंती दिनी पंतप्रधानांनी ट्विट करत काढले गौरवोद्गार म्हणाले…

हिंदी सिनेसृष्टीतील अतिशय दिग्गज आणि प्रसिद्ध गायक मुकेश. ज्यांच्यशिवाय हिंदी चित्रपटांचा इतिहास अपूर्ण आहे, अशा गायक मुकेश यांची नुकतीच १०० वी जयंती साजरी झाली. मुकेश यांनी हिंदी सिनेमात अभूतपूर्व योगदान देत अनेक अजरामर गाणी गायली आहेत. त्यांच्या १०० व्या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण जगभरातील त्यांचे फॅन्स त्यांची आठवण काढत आहे. या खास दिनी देशाचे पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत मुकेश यांना अभिवादन केले आहे.

मेलेडी किंग असलेल्या मुकेश यांची आठवण काढताना मोदी यांनी ट्विटमध्ये लिहिले, “मेलेडीचे उस्ताद मुकेश यांच्या १०० व्या जन्मदिनी मी त्यांची आठवण काढतो. त्यांचे सदाबहार गाणे आपल्या भावनांना अतिशय उत्तम प्रकारे व्यक्त करतात. मुकेश यांनी भारतीय संगीतावर आपली एक वेगळी छाप सोडली आहे. त्यांचा सोनेरी आवाज आणि थेट मनाला भिडणारे सादरीकरण पुढील अनेक दशकांपर्यंत लोकांना मंत्रमुग्ध करत असेल.”

नरेंद्र मोदी यांनी केलेले हे ट्विट अभिनेता निल नितीन मुकेशने रिट्विट केले आहे. त्याने त्याच्या ट्विटमध्ये म्हटले, “नमस्कार माननीय नरेंद्र मोदी जी. आभार आणि मला खूपच सन्मानित वाटत आहे. हे संपूर्ण मुकेश कुटुंबासाठी गर्वाचे क्षण आहेत. माझे वडील आणि मी तुमचे आभार व्यक्त करतो. या दिवशी तुमच्या या ट्विटने आमच्या मनाला स्पर्श केला आहे.”

दरम्यान मुकेश यांचा जन्म २२ जुलै १९२३ रोजी दिल्लीमध्ये झाला. १९४४ साली त्यांनी त्यांचे गायन करियर सुरु केले. मुकेश यांनी त्यांच्या आवाजाने केवळ भारतात नाही तर परदेशात देखील लोकांचे मनोरंजन केले आणि आपली ओळख निर्माण केली. मुकेश यांनी राज कपूर यांच्यासाठी सर्वात जास्त गाणी गायली.

अधिक वाचा- 

दुःखद! संपूर्ण जगाला खळखळून हसवणाऱ्या ‘या’ विनोदवीराच्या मुलीचे निधन

“हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये कोणीच मित्र नाहीत” बॉलिवूडमधील ‘या’ तुफान लोकप्रिय खलनायकाचा मोठा खुलासा

हे देखील वाचा