Tuesday, September 26, 2023

दुःखद! संपूर्ण जगाला खळखळून हसवणाऱ्या ‘या’ विनोदवीराच्या मुलीचे निधन

चार्ली चॅप्लिन हे नाव ऐकताच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक हसू आणि डोळ्यात एक चमक येते. कोणत्याही संवादाशिवाय केवळ आपल्या हातवाऱ्यांच्या आणि एक्सप्रेशनच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले. आजही चार्ली चॅप्लिनला ओळखत नाही असे लोकं शोधूनही सापडणार नाही. मात्र अशा या चाली चॅप्लिन यांच्या पारोवरातून एक दुःखद बातमी समोर येत आहे.

चार्ली चॅप्लिन यांची मुळी असलेल्या अभिनेत्री जोसेफिन चॅप्लिन यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. चॅप्लिन यांच्या कुटुंबाकडून मिळणाऱ्या एका माहितीनुसार १३ जुलै रोजी पॅरिसमध्ये जोसेफिन यांचे निधन झाले आहे. दरम्यान जोसेफिन चॅप्लिन या देखील हॉलिवूडमध्ये अभिनेत्री होत्या. त्यांचा जन्म २८ मार्च १९४९ रोजी सांता मोनिका, कॅलिफोर्निया या ठिकाणी झाला. जोसेफिन चॅप्लिन या चार्ली चॅप्लिन यांचे तिसरे अपत्य होत्या.

जोसेफिन यांनी वयाच्या केलेल्या तिसऱ्याच वर्षी त्यांच्या वडिलांसोबत अर्थात चार्ली चॅप्लिन यांच्यासोबत १९५२ साली आलेल्या ‘लाइमलाइट’ सिनेमात काम केले होते. त्यानंतर पुढे मोठे झाल्यानंतर त्यांनी देखील अभिनयाची कास धरली. जोसेफिन चॅप्लिन यांना चार्ली, ऑर्थर, ज्युलियन रोनेट अशी तीन मुलं आहेत. मायकल, गेराल्डिन, व्हिक्टोरिया जेन, युजीन आणि ख्रिस्तोफर या जोसेफिन यांच्या भावंडानी देखील आपल्या बहिणीला श्रद्धांजली वाहत जोसेफिन यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.

जोसेफिन चॅप्लिन यांनी हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘द कँटरबरी टेल्स’ हा त्यांचा सिनेमा हिट ठरला होता. ‘द बे बॉय’ हा सिनेमाही चर्चेत होता. त्यानंतर टेलिव्हिजनची मिनी सीरिज हेमिंग्वे यामध्येही जोसेफिन यांनी काम केले होते. चित्रपटांसोबत त्यांनी ‘एस्केप टू द सन’ या नाटकामध्ये देखील काम केले आहे. तर ‘हेमिंग्वे’ या टीव्ही मालिकेत देखील काम केले आहे.

अधिक वाचा- 
बाबो!!! अल्लू अर्जुनकडून ‘पुष्पा 2’चा डायलॉग लीक, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
नाकातून गातो म्हणून टीकेचा धनी ठरणाऱ्या हिमेशला ‘भाईजान’ने दिलेला पहिला ब्रेक, 120सिनेमांना दिलंय संगीत

हे देखील वाचा