Thursday, March 28, 2024

पूजा बेदी झाली कोरोनाची शिकार, ‘या’ कारणामुळे लस घेणे टाळते अभिनेत्री

कोरोना महामारीच्या विळख्यात अनेक कलाकार सापडले आहेत. मागच्या वर्षभरात अमिताभ बच्चनपासून ते आमीर खानपर्यंत अनेक सेलिब्रेटी कोरोना संक्रमित झालेले पाहायला मिळाले. आता या यादीत आणखी एका अभिनेत्रीचे नाव समाविष्ट झाले आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे पूजा बेदी. होय, पूजाला कोरोनो विषाणूची लागण झाली आहे. तिने ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे.

पूजा बेदीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तिने आपल्या चाहत्यांना आणि शुभचिंतकांना माहिती दिली आहे. या व्हिडिओमध्ये सुरुवातीला पूजा म्हणाली, “की मला ऍलर्जी आणि खोकला झाला होता. त्यानंतर मला ताप आला. ताप आपल्यानंतर मी टेस्ट करून घेतली तर, माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.” (pooja bedi tests positive for covid says i choose to stay unvaccinated)

घरातील बाकीचे सदस्य देखील कोरोनो पॉझिटिव्ह
पूजाने व्हिडिओमध्ये सांगितले की, “माझ्यासोबत माझे घरचे आणि माझा मंगेतर कोरोना विषाणूच्या विळख्यात आले आहेत”  यानंतर शेवटी तिने आपल्या चाहत्यांना सुरक्षित राहण्यास सांगितले.

https://www.instagram.com/tv/CVIRbT4NcPM/?utm_source=ig_web_copy_link

या गोष्टीचे करतेय सेवन
पूजा बेदी यांनी आपल्या व्हिडिओमध्ये असे सांगितले आहे की, कोरोनोपासून लवकर बरे होण्यासाठी ती निरोगी गोष्टी खात आहे. तिने सांगितले की ती उसाचा रस, काडा, ताजी फळे आणि मिठाच्या पाण्याने गुळणा करत आहे व वाफ देखील घेत आहे.

…म्हणून नाही घेतली लस
पूजा बेदीने व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “कोव्हिड पॉझिटिव्ह. अखेर मी या विषाणूमध्ये अडकलेच. लस न घेण्याचा निर्णय हा माझा होता आणि हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. मला वाटते की माझी नैसगिक रोग प्रतिकारक क्षमता आणि वैकल्पिक उपचार स्वतःला ठीक होण्यासाठी आवश्यक आहे. तुम्ही तेच करा जे तुम्हाला योग्य वाटते. काळजी घ्या, घाबरू नका.”

अनेक कलाकारांनी पुजा बेदीच्या या पोस्टवर कंमेंट केल्या आहेत आणि तिला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले, “लवकर बरे व्हा.” तर दुसऱ्या चाहत्याने लिहिले, “तुम्ही लवकरच बरे व्हाल.” काही दिवसांपूर्वी पूजाने कोरोनाच्या लसीबद्दल प्रश्न उपस्थित केले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनेत्री पूजा बेदीच्या ‘या’ कंडोम जाहिरातीने उभा ठाकला होता वाद, दूरदर्शनवर केली होती बंद

-‘माझ्या काळात वर्जिन असणं खूप महत्त्वाचं होतं अन् आता…’, अभिनेत्री पुजा बेदीने मुलगी अलायाबद्दल केलं मोठ भाष्य

-अशा काही अभिनेत्री, ज्यांच्या पतीने केलंय दुसरं लग्न; घटस्फोट झाल्यानंतर आज एकटे जगतायेत त्या आयुष्य

हे देखील वाचा