Thursday, April 25, 2024

बाहुबलीने सैफ आणि करीनाला पाठवली बिर्याणी, खास पोस्ट शेअर करत बेबोने मानले त्याचे आभार

साऊथचा सुपरस्टार प्रभासचे अनेक उत्तम चित्रपट आगामी काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यापैकी एक आहे ‘आदिपुरुष’ ज्यामध्ये सैफ अली खान आणि क्रिती सेननही त्याच्यासोबत काम करत आहेत. प्रभास सेटवर त्याच्या सहकलाकारांची काळजी घेण्यासाठी ओळखला जातो. याचा पुरावा त्याने पुन्हा दिला आहे. ‘आदिपुरुष’चे चित्रपटाचे काम सुरू होण्यापूर्वी प्रभासने सैफच्या कुटुंबासोबत चांगले संबंध निर्माण करण्यास सुरुवात केल्याचे दिसते. प्रभासने चित्रपटातील त्याचा सहकलाकार सैफ अली खानला बिर्याणी पाठवली आहे. जी त्यांना खूप आवडली. बिर्याणीचा फोटो सैफ अली खानची पत्नी करीना कपूरने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

Photo Courtesy: Instagram/kareenakpoorkhan

सैफ आणि करीना यांनी प्रभासने पाठवलेली बिर्याणी मोठ्या उत्साहाने खाल्ली आहे. फोटो शेअर करताना करीनाने लिहिले की, “चला खाऊया, बाहुबलीने बिर्याणी पाठवली आहे म्हटल्यावर ती सर्वात चांगलीच असेल. प्रभास या उत्तम जेवणासाठी धन्यवाद.” करीनाने प्रभासचे बिर्याणीसाठी आभार मानले आहेत. तिने कॅप्शनमध्ये आदिपुरुष हॅशटॅग देखील जोडला आहे.

प्रभास आणि सैफ अली खान ‘आदिपुरुष’ चित्रपटात क्रमशः राम आणि रावणाची भूमिका साकारताना दिसतील. या चित्रपटात क्रिती सेनन सीतेची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेता सनी सिंग लक्ष्मणची भूमिका साकारत आहे. आगामी काळात ‘आदिपुरुष’ व्यतिरिक्त प्रभास ‘राधे श्याम’ या रोमँटिक चित्रपटातही दिसेल. याशिवाय प्रभास नाग अश्विनच्या पुढील चित्रपटातही काम करत आहे. ज्यात दीपिका पदुकोण त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत आहे. तो केजीएफचे दिग्दर्शक प्रशांत नील यांच्यासोबत ‘सालार’ चित्रपटातही काम करत आहे.

करीनासोबत प्रभासचा हा पहिला संवाद आहे जो तिने चाहत्यांशी शेअर केला आहे. तसे पाहिले, तर प्रभास आजकाल अनेक बॉलिवूड कलाकारांसोबत काम करत आहेत. श्रद्धा कपूर आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यासोबत ‘साहो’मध्ये दिसल्यानंतर, आता तो क्रिती सेनन आणि दीपिका पदुकोण सारख्या बॉलिवूड अभिनेत्रींसोबत दिसेल.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जन्मापासून आतापर्यंतचे निवडक फोटो शेअर करत स्वप्नील जोशीने लेकीला दिल्या जागतिक कन्यादिनाच्या शुभेच्छा

‘अपने पास बहुत पैसा है,’ म्हणत नेहाने अनोख्या अंदाजात दिल्या परीला कन्यादिनाच्या शुभेच्छा

-अखेर प्रतीक्षा संपली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार रणवीर सिंग अन् दीपिका पदुकोणचा ‘८३’ चित्रपट

हे देखील वाचा