×

प्रसिद्ध चित्रपट निर्माता काळाच्या पडद्याआड! दिग्गजांकडून शोक व्यक्त, सोशल मीडियावर श्रद्धांजलीचा ओघ

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक नावाजलेले नाव आज (शुक्रवार, 28 डिसेंबर) काळाच्या पडद्याआड झाले आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक कट्टे रामचंद्र (Katte Ramachandra) यांचे वयाच्या 75व्या वर्षी निधन झाले आहे. अनेक दिग्गज अभिनेते, कलाकार आणी सिनेसृष्टीशी संबंधीत व्यक्तींनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. (Director and producer Katte Ramachandra passes away)

रामचंद्र कट्टे यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1947 रोजी झाला होता. कन्नड सिनेक्षेत्रात (Kannada language film industry) त्यांचा चांगलाच दबदबा होता. एकूण 40 वर्षांच्या करियरमध्ये त्यांनी अनेक चित्रपट आणि टेलिव्हिजन मालिकांची निर्मिती तसेच दिग्दर्शन केले होते. (sandalwood industry)

अधिक वाचा – बर्थडे स्पेशल : आई-वडिलांच्या लग्नाआधीच झाला होता ‘तिचा’ जन्म, आज बॉलिवूडसह साऊथचीही बनलीये सुपरस्टार

Katte-Ramachandra
Photo Courtesy: Instagram / Katte Ramachandra FC

एप्रिल 1993 मध्ये रिलीज झालेल्या ‘विशाका डिंगलू’ (Viashaka Dingalu) या प्रसिद्ध चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात ‘विष्णुवर्धन’ मुख्य भूमिकेत दिसले होते. तसेच कट्टे रामचंद्र यांनी ‘अरिवू’ सारख्या चित्रपटाची आणि ‘माने माने काथे’, ‘आलेगलू’ सांरख्या टीव्ही मालिकांची देखील निर्मिती केली होती.

त्यामुळेच कट्टे रामचंद्र यांच्यासारख्या आसामीचे निधन ही कन्नड भाषेची आणि कन्नड सिनेसृष्टीची मोठी हानी असल्याचे बोलले जात आहे. या प्रसिद्ध दिग्दर्शकाचे निधन वयाच्या 75व्या वर्षी वार्धक्याने झाल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा –

‘पुतळ्याचा विचार ठीक आहे पण…’ पीएम मोदींच्या ‘त्या’ निर्णयावर जावेद अख्तर यांनी केला आक्षेप

अनुपम खेर यांच्या आईने पंतप्रधान मोदींना आशीर्वाद देत म्हटले, “यावेळेस सुद्धा हेच निवडणूक जिंकणार”

Latest Post