वास्तव्य परदेशात, पण हृदय मात्र भारतात! सतत ‘या’ ३ गोष्टी जवळ बाळगते देसी गर्ल प्रियांका चोप्रा

अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही एक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी आहे. प्रियांका चोप्राने केवळ बॉलिवूडमध्येच नाही, तर हॉलिवूडमध्ये नाव कमावले केले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने बऱ्याच मनोरंजक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्याची खूप चर्चा होता आहे.

भारतापासून दूर राहूनही ती देशाच्या मातीशी कशी जोडली गेलेली आहे प्रियांकाने स्पष्ट केले आहे. तिने म्हटले आहे की, तिच्या मनामध्ये भारत बसलेला आहे. ती कुठेही असो, मंदिर, लोणचे आणि तिची आई मधु चोप्रा सतत तिच्या सोबत राहतात.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांका एका मुलाखतीत म्हणाली की, “तुम्ही मला भारतातून बाहेर काढू शकता पण माझ्या मनातून भारताला कधीच दूर करू शकत नाही.” प्रियांका असेही म्हणते की, तिला दोन्ही उद्योगांना (हॉलीवुड + बॉलिवूड) एकत्रित बॅलन्स साधायचा आहे. तिचा आगामी चित्रपट ‘द मॅट्रिक्स रिजरेक्शन्स (the matrix resurrections) आहे. या चित्रपटात अभिनेत्री सतीच्या भूमिकेत दिसणार आहे. (priyanka chopra keeps these three special things with her all time)

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांका चोप्रा अलीकडे एका पोस्टसाठी चर्चेत आली होती. निक जोनासची पत्नी म्हटल्याबद्दल तिला राग आला होता. खरं तर एका लेखात प्रियांका चोप्राला अमेरिकन गायक निक जोनास याची पत्नी म्हणून संबोधण्यात आले होते. अभिनेत्रीने यावर आक्षेप घेतला आणि प्रतिउत्तरही दिले.

निक आणि प्रियांकाने २ डिसेंबर राजस्थान येथे लग्न केले होते. दोघांच्या लग्नाला ३ वर्षे पूर्ण झाली आहेत. तर निक आणि प्रियांकामध्ये १० वर्षाचे अंतर आहे.

हेही वाचा –

Latest Post