बोल्ड एँड ब्युटीफुल! प्रियांका चोप्राने केला स्विमसूटमधील फोटो शेअर; एकाच तासात पडला ७ लाख लाईक्सचा पाऊस


भारतात आपल्या अभिनयाचा डंका वाजवल्यानंतर परदेशातही आपल्या अभिनयाचा झेंडा शिखरावर लावणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा होय. प्रियांकाकडे आंतरराष्ट्रीय स्टार म्हणूनच पाहिले जाते. एकीकडे चित्रपटातून प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित करण्याव्यतिरिक्त ती दुसरीकडे सोशल मीडियावरही कमालीची सक्रिय असते. विशेष म्हणजे इंस्टाग्रामच्या रिचलिस्ट २०२१ मध्येही प्रियांकाच्या नावाचा समावेश आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच आपल्या आयुष्यातील चांगल्या- वाईट गोष्टी शेअर करत असते. अशातच आता तिने पुन्हा एकदा आपल्या दोन फोटोंनी इंटरनेटवर राडा केला आहे. विशेष म्हणजे शेअर करताच हे फोटो व्हायरलदेखील झाले आहेत.

प्रियांकाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपले दोन फोटो शेअर केले आहेत. यात ती स्विमसूटमध्ये खूपच हॉट  दिसत आहे. हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये “अपेक्षा विरुद्ध  वास्तविकता,” असे लिहिले आहे. एका फोटोत ती सेंशुअल एक्सप्रेशन्स देत आहे, तर दुसऱ्या फोटोत ती हसताना दिसत आहे. (Actress Priyanka Chopra Jonas Swimsuit Photo On Instagram Captions Expectation vs Reality)

चाहत्यांच्या प्रतिक्रिया
प्रियांकाचे हे फोटो इंस्टाग्रामवर वेगाने व्हायरल होत आहेत. जवळपास १ तासातच या पोस्टला जवळपास ७ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. दुसरीकडे हजारो कमेंट्सही मिळाल्या आहेत. अधिकतर चाहते प्रियांकाची प्रशंसा करत आहेत, तर दुसरीकडे युजर्स तिच्या कपड्यांवरही कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले की, “चांगली आहे, पण जरा चांगला ड्रेस परिधान कर.”

‘सिटाडेल’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त
प्रियांका सध्या ‘सिटाडेल’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकताच तिने शूटिंग सेटवरील एक फोटो शेअर केला होता. या फोटोत तिच्या चेहऱ्यावर मेकअप करण्यात आला आहे. ज्यात ते रक्तासारखे दिसत आहे. प्रियांकाने या फोटोला कॅप्शन देत लिहिले आहे की, “होय. तुम्ही दुसऱ्या व्यक्तीचे हाल पाहिले पाहिजे.” यासोबतच तिने #Citadel चाही वापर केला आहे. ‘सिटाडेल’ची निर्मिती मार्व्हल चित्रपटाची दिग्दर्शक जोडी जो आणि एँथनी रूसो करत आहेत.

‘द व्हाइट टायदर’ होता शेवटचा बॉलिवूड चित्रपट
प्रियांकाचा शेवटचा बॉलिवूड चित्रपट हा ‘द व्हाइट टायगर’ होता. दुसरीकडे सन २०२० मध्ये ती हॉलिवूड चित्रपट ‘वी केन बी हिरोज’मध्ये झळकली होती. प्रियांकाच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘सिटाडेल’सोबतच ‘मॅट्रिक्स ४’चाही समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुंदर अन् सुशील!’ अक्षय कुमारची अभिनेत्री चित्रांगदाने साडीतील फोटो शेअर करत लावलं नेटकऱ्यांना याड

-टायगर श्रॉफची बहीण कृष्णाने सांगितला तिचा फिटनेस मंत्र; म्हणाली, ‘सातत्य हीच तुमच्या यशाची…’

-वाढदिवशी मिळालेल्या शुभेच्छांसाठी कॅटरिनाने फोटो शेअर करत मानले सर्वांचे आभार; म्हणाली, ‘तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल…’


Leave A Reply

Your email address will not be published.