×

वाढदिवसानिमित्त आलिया भट्टला ग्रेटभेट, आरआरआर चित्रपटातील ‘शोले’ गाणे झाले प्रदर्शित

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट(Alia Bhatt)  गेल्या काही दिवसांपासून तिच्या दमदार अभिनयामुळे चर्चेत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘गंगूबाई काठियावाडी‘ मधील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. आज (१५ मार्च) आलिया भट्टचा वाढदिवस. संपुर्ण चित्रपट जगतातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. त्याचबरोबर तिला वाढदिवसाच्या दिवशीच आगामी चित्रपटाच्या निर्मात्यांनी सुंदर भेट दिली आहे. ती म्हणजे आता तिच्या ‘आरआरआर’ चित्रपटातील गाणे रिलीज करण्यात आले आहे. सध्या या गाण्याची सगळीकडे चर्चा रंगली आहे.

आलिया भट्ट हि हिंदी चित्रपट जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्या दमदार अभिनयाची आणि सौंदर्याची नेहमीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत असते. आज (१५ मार्च) आलिया तिचा वाढदिवस जल्लोषात साजरा करत आहे आणि या खास दिवसाआधीच तिच्या चाहत्यांना एका गाण्याच्या रूपाने एक मोठे सरप्राईज मिळाले आहे. आरआरआर सिनेमातील आलियावर चित्रित झालेले गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यात साऊथचे सुपरस्टार ज्युनियर एनटीआर आणि राम चरण ढोलाच्या तालावर डोलताना दिसत आहेत, तर आलिया भट्टही दोघांसोबत या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.\

चित्रपटातील तिन्ही कलाकार पारंपारिक वेशभूषेत खूपच मनमोहक दिसत आहेत. गुलाबी साडीत आलिया खूप सुंदर दिसत आहे, तर ज्युनियर एनटीआरने काळा कुर्ता पांढरा पायजमा घातला आहे आणि रामचरणने पिवळा कुर्ता पांढरा पायजमा घातला आहे. तिघांचेही गाण्यातील एनर्जी लेव्हलचे खूप कौतुक केले जात आहे. या गाण्याचे बोल रिया मुखर्जी यांनी लिहिले आहेत, तर संगीत दिग्दर्शक एमएम करीम आहेत, तर विशाल मिश्रा, बेनी दयाल, साहित्यी चगंटी आणि हरिका नारायण एन यांनी हे गाणे गायले आहे.

सुपरस्टार राम  चरण, ज्युनियर एनटीआर आणि आलिया भट्ट यांच्याशिवाय बॉलीवूड अभिनेता अजय देवगण देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अनेक दिवसांपासून चर्चेत राहिलेला हा मेगा बजेट चित्रपट असल्याची माहिती समोर आली आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनावर बनलेला हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहे. आता अखेर हा चित्रपट येत्या २५ मार्च रोजी तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे, ज्याची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post