पुष्पा २: रुल या चित्रपटाचा प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. त्या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
चित्रपटाचा प्रदर्शनाबाबत निर्मात्यांनी मोठा खुलासा केला आहे.
पुष्पा २ : रूल येत्या 6 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. सध्या चित्रपटाचा क्लायमॅक्स भागाचे शूटिंग हैदराबाद येथे सुरू आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटात अल्लू अर्जुन सोबतच फहद फासिल, अनुसया भारद्वाज, सुनील, राव रमेश, जगदीश असे प्रतिभावान कलाकार दिसणार आहेत.
2021 मध्ये पुष्पा चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिस वर त्याने चांगलीच कमाई केली होती. त्यामुळे , अल्लु अर्जुन चे चाहते चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट बघत आहे. पुष्पा २ प्रेक्षकांना खुर्चीत खेळवून ठेवणार का हे पाहणे निश्चितच मनोरंजक असणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
बिग बॉसच्या घराबाहेर येताच पुरुषोत्तम दादांनी केली पोलखोल!
शेख हसीना बांगलादेश सोडून भारतात आल्यावर कंगना म्हणाली, ‘मुस्लिम देशांमध्ये कोणीही सुरक्षित नाही’