28 जुलै रोजी सुरू झालेला बिग बॉस सिजन 5 चांगलाच गाजतोय. लोकप्रिय कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पहिल्याच आठवड्यात घराबाहेर पडले. बाहेर आल्यावर त्यांच्याकडून इतर सदस्यांची पोलखोल करण्यात आली.
मुलाखती दरम्यान बोलताना पुरुषोत्तम दादा म्हणाले , ‘सगळ्यांना फक्त १ तासाचा एपिसोड दिसतो पण खरं तर आम्ही २४ तास एकत्र असतो. तिथे खूप काही घडत असतं. निकी, अरबाज, वैभव , जान्हवी एकत्र राहतायत हे अख्खा महाराष्ट्र पाहतोय. त्यांच्या डोक्यात सतत तोच खेळ आहे की आपण दिसलो पाहिजे. पण बाकीची माणसं मात्र मराठी जगणारी माणसं आहेत.’
पुढे दादा म्हणाले , ‘ निक्की व ताई याचं घरात कायम वाजत होत. निक्की ने वर्षा ताईचा मोठेपणा जपायला हवा होता. व वर्षा ताईनी सुद्धा काही गोष्टी सोडून द्यायला हव्यात. त्या दोघी सारख्या स्वभावाच्या असल्याने त्यांच्यात एवढे वाद होताय.’
‘घरातला बेस्ट प्लेअर म्हणजे अभिजीत सावंत. तो बोलत नाही काही पण त्याच्या डोक्यात खेळ सुरू असतो. त्याची ही गोष्ट मला जाणवली. त्याला तो गेम कळतोय.’ अस मला वाटत, असे पुरुषोत्तम दादा म्हणाले. येत्या आठवड्यामध्ये बिग बॉसच्या घरामध्ये आपल्याला कॅप्टनसी वरून स्पर्धकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
शेख हसीना बांगलादेश सोडून भारतात आल्यावर कंगना म्हणाली, ‘मुस्लिम देशांमध्ये कोणीही सुरक्षित नाही’
राज्यसभेत पुन्हा भडकल्या ज्या बच्चन ! यावेळी सभापतींनी दिले खणखणीत उत्तर…