Friday, April 19, 2024

‘इन्स्पेक्टर अविनाश’मध्ये झळकणार अध्यात्मिक गुरु राधे माँ यांचा मुलगा हरजिंदर सिंग

राधे माँ नाव उच्चारले तरी लाल साडी हेव्ही मेकअप आणि हातात त्रिशूल अशी एक छवी डोळ्यासमोर येते. अध्यात्माच्या जगातील राधे माँ हे आघाडीचे आणि सतत वादात अडकणारे नाव आहे. अनेक वादांमध्ये अडकूनही आज राधे माँला संपूर्ण जगात असंख्य अनुयायी आहेत. त्या नेहमीच त्यांच्या अध्यात्मिक प्रवचनांमुळे चर्चेत येत असतात, मात्र आता त्या चर्चेत येण्यामागचे कारण अतिशय वेगळे आहे. राधे माँ यांना एक मुलगा असल्याचे खूपच कमी लोकांना माहित असेल. आता हाच राधे माँ यांचा मुलगा हरजिंदर सिंग लवकरच ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या सिरीजमध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

हरजिंदर सिंगने आतापर्यंत ‘ड्रीम गर्ल’ आणि ‘आई एम बन्नी’ सिनेमांमध्ये काम केले. राधे माँचा मुलगा हरजिंदर आणि रणदीप हुड्डासोबत ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. या सिरीजमध्ये हरजिंदर महत्वाच्या भूमिकेत दिसून येणार असून, आता सर्व लोकं हरजिंदरला या सिरीजमध्ये बघण्यासाठी उत्सुक आहेत.

राधे माँचा मुलगा हरजिंदर सिंगने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले, त्याला लहानपणापासूनच अभिनेता किंवा क्रिकेटर व्हायचे होते. म्हणाला की, “लहानपणापासूनच माझे दोनच छंद होते एक तर क्रिकेट आणि दुसरा म्हणजे अभिनय. जेवढे मला माहित आहे की, क्रिकेटरला वयाची मर्यादा असते. आधी अभिनयाला देखील होती. मात्र आता असे नाही तुम्ही पाहिजे त्या वयात कॅमेऱ्यासमोर येतात. फक्त मुख्य अभिनेत्याचे किंवा तरुणांच्या भूमिका साकारू शकत नाही. मी एमआईटी पुण्यातून शिक्षण घेतले. तिथे होणाऱ्या सर्व कार्यक्रमांमध्ये मी सहभाग घ्यायचो. तिथूनच हळूहळू लिंक्स मिळत गेल्या आणि मला समजले की मला स्टेजवर राहायला आवडते.”

रणदीप हुड्डासोबत काम करण्याबद्दल हरजिंदर म्हणाला, “त्याच्यासोबत काम करण्याचा माझा अनुभव खूपच चांगला होता. एक अभिनेता म्हणून रणदीप मला खूपच आवडतो. मी लखनऊमध्ये शुटिंगवेळी त्याला सांगितले होते की, फक्त त्याच्यासाठी मी काही सिनेमे पाहायला गेलो आहे.” हरजिंदर म्हणाला की, “त्याच्याकडे सध्या काही मोठे प्रोजेक्ट्स आहेत मात्र आता त्यावर बोलणे खूपच घाई ठरेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा