अभिनेत्री रायमा सेनने फ्रीजसमोर बसून दिला ‘असा’ पोझ; पाहून नेटकऱ्यांनी केले जोरदार ट्रोल


बॉलिवूड अभिनेत्री रायमा सेन ही तिच्या सौंदर्यामुळे मागील दोन दशकांपासून प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असणारी अभिनेत्री आहे. तिच्या फॅशन सेन्सने ती सर्वांना तिच्याकडे आकर्षित करत असते. यासोबत चित्रपटातील जबरदस्त अभिनयामुळे ती नेहमीच कौतुकास पात्र ठरते. तिच्या फिटनेसमुळे ती नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील तिचा चांगलाच वावर असतो. तिचे बोल्ड फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने नुकतेच तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे सगळेजण तिची थट्टा उडवत आहे.

मागील काही दिवसांपासून रायमा तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. काही दिवसांपूर्वी तिने टॉपलेस फोटो शेअर केला होता. त्यामुळे ती सर्वत्र चर्चेत होती. त्यानंतर बिकिनीमधील फोटो शेअर करून तिने सोशल मीडियावर चांगलाच राडा केला होता. यानंतर तिने आता उघडलेल्या फ्रीजसमोर बसून फोटोशूट केले आहे.

फ्रीजच्या समोर बसलेला हा फोटो पाहून काहीजण तिचे कौतुक करत आहेत, तर काहीजण तिची चांगलीच मजा घेत आहे. रायमा फ्रिजसमोर बिकिनी घालून एक स्टोल घेऊन बसलेली दिसत आहे. यासोबतच तिने हाय हिल्स घातले आहेत. ती दोन पायांवर खाली बसली आहे. तिची ही पोझ बघून नेटकऱ्यांनी ‘खुले मे शौच’ यांसारख्या कमेंट करून तिला ट्रोल केले आहे.

रायमा ही नेहमीच सोशल मीडियावर तिचे हॉट आणि सिझलिंग फोटो शेअर करत असते. तिने नुकतेच काही दिवसांपूर्वी ‘द: लास्ट आवर’ या वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिका निभावली आहे. तिने या सीरिजबाबत तिचा अनुभव शेअर केला होता.

या वेब सीरिजमध्ये तिच्या सोबत संजय कपूर आणि शाहना गोस्वामी यांच्यासोबत काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘पावसाळ्या संध्याकाळी होणारे काही मूड…’, म्हणत भजी खाण्यापूर्वी शेतात फिरताना दिसतोय सुव्रत जोशी

-जेव्हा कृष्णा अभिषेकने घेतले होते अनिल कपूरचे रूप; पाहून लोटपोट झाली होती सोनम कपूर

-‘तूच माझ्या जगण्याचा आधार’, सपना चौधरीच्या सुंदर व्हिडिओवर चाहत्याची प्रेमळ कमेंट


Leave A Reply

Your email address will not be published.