Friday, September 25, 2026
Home › बॉलीवूड › ‘महोदय मला या पॉर्नोग्राफीच्या प्रकरणातून मुक्त करा’, राज कुंद्राची कोर्टात याचिका

‘महोदय मला या पॉर्नोग्राफीच्या प्रकरणातून मुक्त करा’, राज कुंद्राची कोर्टात याचिका

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (shilpa shetty) पती आणि उद्योगपती राज कुंद्रा (raj kundra) यांनी मुंबईच्या दंडाधिकारी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी अ‍ॅप्सद्वारे कथित अश्लील चित्रपट बनवणे आणि त्याचे वितरण केल्याच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्याची विनंती केली आहे. या प्रकरणी राजला जुलै २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती. तो आता जामिनावर बाहेर आहे. त्याचे वकील प्रशांत पाटील यांनी २० जुलै रोजी दोषमुक्तीसाठी अर्ज केला होता, त्याचा तपशील बुधवारी समोर आला.

राज कुंद्राने कथित गुन्ह्यातून आर्थिक किंवा अन्य प्रकारचा नफा कमावल्याचे कोणतेही पुरावे पोलिसांना सापडलेले नाहीत, असे याचिकेत म्हटले आहे. याशिवाय, फिर्यादीने त्याच्यावर गुन्हेगारी हेतूचा कोणताही आरोप लावलेला नाही. न्यायालयाने फिर्यादी पक्षाला ८ सप्टेंबर रोजी उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे.

एका महिलेने अनेक गंभीर आरोप केल्यानंतर आणि तक्रार दाखल केल्यानंतर राज कुंद्रा आणि इतरांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला होता. नंतर हे प्रकरण मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. राज यांच्यावर भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम ४२०, २९२ आणि २९३ आणि माहिती तंत्रज्ञान कायदा आणि महिलांचे अशोभनीय प्रतिनिधित्व (प्रतिबंध) कायदा, १९८६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज कुंद्रा यांच्या मुंबईतील कार्यालय आणि जुहू येथील बंगल्यावरही पोलीस अधिकाऱ्यांनी छापे टाकले. राज यांना गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जामीन मंजूर झाला होता. त्याच्या सुटकेच्या काही महिन्यांनंतर, राज कुंद्राने एका निवेदनात म्हटले होते की संपूर्ण भाग हा त्याच्याविरुद्ध ‘विच हंट’ होता, ज्या अंतर्गत त्याला गोवण्यात आले होते.

राज कुंद्रा म्हणाले होते की, “खूप विचार केल्यावर माझ्या विरोधात अनेक दिशाभूल करणारे आणि बेजबाबदार लेख लिहिले गेले आहेत. माझ्या मौनाचा कमकुवतपणाचा गैरसमज झाला. मी माझ्या आयुष्यात ‘पोर्नोग्राफी’ बनवण्याच्या आणि वितरणात कधीच सहभागी नव्हतो हे सांगून सुरुवात करू इच्छितो. हे संपूर्ण प्रकरण दुसरे तिसरे काही नसून विच हंट आहे.” अशाप्रकारे त्याने त्याचे मत मांडले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘या’ कारणामुळे राजीव यांचे वडील राज कपूरांसोबत बिघडले होते नाते; त्यांच्या अंत्यसंस्कारातही सामील नव्हते अभिनेते
शूटिंगदरम्यान राजीव कपूर पडले होते पद्मिनी कोल्हापुरेच्या प्रेमात; राज कपूर यांनी धमकी दिल्यावर तुटले होते दोघांचे नाते
प्रेग्नेंसीमध्ये बिकिनी घालून समीरा रेड्डीने केले होते फोटोशूट, महिलांना दिलेला ‘हा’ संदेश

हे देखील वाचा