राज कुंद्रा अन् शिल्पा शेट्टी यांची जुहू बंगल्यावर झाली सहा तास कसून चौकशी; विचारले गेले ‘हे’ प्रश्न


बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट बनवून ते ऑनलाईन ऍपद्वारे दाखवल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. त्याची ही पोलीस कोठडी २७ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. कोर्टाने त्याची पोलीस कोठडी वाढवल्यानंतर आता मुंबई क्राईम ब्रांच चौकशी करण्यासाठी शिल्पा शेट्टीच्या घरी पोहचली आहे. तिथे पोलिसांनी सहा तास दोघांची चौकशी केली आहे. यावेळी राजच्या चेहऱ्यावर खूपच भोळा भाव होता.

शिल्पा शेट्टीच्या घरी सहा तास तपासणी केल्यानंतर, त्यांना रात्री उशिरा प्रॉपर्टीच्या सेल ऑफिसमध्ये नेण्यात आले. जिथे राज कुंद्राला त्याची सगळी संपत्ती नक्की कोठून आणि कधी खरेदी केली आहे याचे मार्ग विचारले गेले.

त्याची पोलीस कोठडी वाढवल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याच्या जुहू बंगल्यावर त्याची सहा तास चौकशी चालली होती. या दरम्यान त्याला अनेक प्रश्न विचारले गेले. परंतु या दरम्यान शिल्पा शेट्टीला नक्की कोणते प्रश्न विचारले याची माहिती अजुन काही समोर आलेली नाही. परंतु सूत्रांच्या माहितीनुसार, राज कुंद्राच्या या ऍपबाबत शिल्पा शेट्टीला आधीपासूनच संपूर्ण माहिती होती. (raj kundra pornography case shilpa shetty interrogated disappointment and wrinkles on he raj kundras face)

यामधून मिळालेला पैसा त्याने अनेकवेळा शिल्पाच्या अकाऊंटवरून मागवला आहे, अशी माहिती देखील समोर आली आहे. या कंपनीमध्ये सुरुवातीला शिल्पा देखील सामील होती, परंतु नंतर तिने कंपनीला राजीनामा दिला होता. त्यांच्या चौकशीनंतर त्याला त्यांच्या बंगल्याबाहेर स्पॉट केले गेले.

राज कुंद्राला अटक झाल्यानंतर याचा परिणाम शिल्पा शेट्टीवर देखील झाला आहे. तिला ‘इंडियाज सुपर डान्सर’ या शो मधून बाहेर काढले आहे. ती या शोमध्ये परीक्षक होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा पहिल्यांदा तुटले होते नुपूर सेननचे हृदय; मन हलके करत म्हणाली, ‘मला रात्री एक वाजता…’

-ओटीटी प्लॅटफॉर्मवर सलमान खान नाही, तर ‘हा’ कलाकार करणार ‘बिग बॉस १५’ होस्ट

-मीरा राजपूतने केली ओठांची सर्जरी? व्हि़डिओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण


Leave A Reply

Your email address will not be published.