पिवळ्या ड्रेसमध्ये खुललं राजेश्वरीचं सौंदर्य! सोज्वळ ‘शालू’चा हॉट लूक बनला चर्चेचा विषय


‘फँड्री’मध्ये झळकलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात या दिवसात खूप चर्चेत असते. विशेष म्हणजे, सोशल मीडियावर तिचा चांगलाच वावर असतो. तिची फॅन फॉलोविंग देखील तगडी आहे. इंस्टाग्रामवर तिला जवळपास तब्बल दीड लाखापेक्षाही अधिक युजर्स फॉलो करतात. म्हणूनच की काय, तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट होताच व्हायरल होऊ लागतात. नुकताच तिने शेअर केलेला फोटो पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय.

हा फोटो राजेश्वरीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. यात ती पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली आहे. फोटोमध्ये पुन्हा एकदा राजेश्वरीचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. या पिवळ्या हॉट ड्रेसमध्ये राजेश्वरीचं सौंदर्य चांगलंच खुललं आहे. फोटोत तिची सुंदरता अगदी पाहण्यासारखी आहे.

नुकत्याच काही मिनिटांपूर्वी शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. सोज्वळ शालूचा बोल्ड अवतार नेहमीच चाहत्यांकडून पसंत केला जातो. बघता बघताच फोटोवर लाईक्स आणि कमेंट्स जोरदार पाऊस पडत आहे. हा फोटो शेअर करत राजेश्वरीने कॅप्शनमध्ये लिहिलंय, “तुम्ही कोणाच्यातरी हास्याचे कारण आहात.” (rajeshwari kharat looking stunning in yellow coloures hot dress)

अलीकडेच तिने एक व्हिडिओ देखील शेअर केला होता. ज्यात ती फोटोशूटसाठी तयार होताना दिसली होती. यामध्ये तिने फुलांच्या डिझाइनची स्टायलिश साडी आणि त्याला साजेसं असं ऑफ शोल्डर काळं ब्लाउज परिधान केलं होतं, ज्यात ती खूपच ग्लॅमरस दिसत होती. विशेष म्हणजे हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत व्हायरल झाला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनयाचे धडे घेतानाचा अनुष्काचा व्हिडिओ व्हायरल; रडण्यासाठी वापरली होती ‘ही’ पद्धत

-जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने गायिका सावनी रविंद्र प्रेक्षकांसाठी घेऊन आली खास मल्याळम गाणं

-‘कमिंग सून’ म्हणत श्रुती मराठेने शेअर केला ग्लॅमरस व्हिडिओ; चाहत्यांना प्रतीक्षा नव्या फोटोशूटची


Leave A Reply

Your email address will not be published.