Saturday, June 29, 2024

ना भाईजान – ना बादशाह, द थलाइवा अर्थात रजनीकांत ठरले देशातील सर्वात महागडे अभिनेते; पाहा किती घेतात मानधन

भारतीय चित्रपटसृष्टीत सध्या सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता कोण? या प्रश्नाचे उत्तर सर्वांनाच मिळाले आहे. ह्याचे कारण प्रख्यात दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत उर्फ थलाइवा यांना ‘जेलर’ चित्रपटासाठी मिळालेल्या मानधनानंतर तेच सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते आहेत, यावर जणू शिक्कामोर्तब झाले आहे. याचे कारण रजनीकांत यांना जेलर या चित्रपटासाठी दहा वीस नाही तर तब्बल 210 कोटी रुपये मानधन मिळाले आहे.

मानधनाच्या बाबतीत रजनीकांत यांनी शाहरुख, सलमान, अक्षय, अल्लू अर्जुन, प्रभास या आघाडीच्या सर्वच अभिनेत्यांना धोबीपछाड दिला आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘जेलर’ या चित्रपटातून रजनीकांत यांनी दमदार कमबॅक केले. ह्या चित्रपटाने जगभरात 600 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. ( rajinikanth became highest paid actor in country )

सन पिक्चर्सने एक्सवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ‘जेलर’ या चित्रपटाला मिळालेल्या तुफान यशाबद्दल निर्माते कलानिधी मारन हे रजनीकांत यांना चेक देताना दिसत आहेत. त्याशिवाय सन पिक्चर्सने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात निर्मात्यांनी रजनीकांत यांना बीएमडब्ल्यू एक्स 7 ही अलिशान कार भेट दिल्याचे दिसत आहे.

अधिक वाचा –
– Gadar 2ने तोडली सनी अन् शाहरुखमधील भिंत, 30 वर्षांनंतर संपली सुपरस्टार्समधील दुश्मनी; व्हिडिओ तुफान व्हायरल
– ‘लता मंगेशकर’ नावामुळेच शक्ती कपूरांच्या वडिलांनी त्यांना ‘या’ चुकीसाठी केले होते माफ, रंजक आहे किस्सा
– मराठमोळ्या अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते घायाळ

हे देखील वाचा