Sunday, December 3, 2023

Gadar 2ने तोडली सनी अन् शाहरुखमधील भिंत, 30 वर्षांनंतर संपली सुपरस्टार्समधील दुश्मनी; व्हिडिओ तुफान व्हायरल

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी सिनेमात एकत्र काम केले आहे. मात्र, त्यांच्यात कोणत्या तरी कारणांमुळे खटके उडाल्यामुळे आज ते एकमेकांचे तोंडसुद्धा पाहत नाहीत. असे असूनही कालांतराने या कलाकारांनी जुन्या गोष्टी मागे सोडून पुन्हा मैत्री केल्याचेही पाहायला मिळाले आहे. असेच काहीसे आता पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाले आहे. बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि ‘अभिनयाचा पॉवरहाऊस’ सनी देओल हे दोघे 30 वर्षांनंतर एकत्र आले आहेत.

सध्या सनी देओल (Sunny Deol) त्याच्या ‘गदर 2‘ (Gadar 2) या सिनेमाच्या यशाचा आनंद लुटत आहे. त्याचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. रिलीजच्या चौथ्या आठवड्यात गदर 2 500 कोटी (Gadar 2 500 Crore) रुपयांच्या क्लबमध्ये सामील होणार असल्याची चाहत्यांना आशा आहे. अशात सिनेमाची सर्व टीम खूपच खुश असून हा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी त्यांनी शनिवारी (दि. 02 सप्टेंबर) एक पार्टी ठेवली होती. या पार्टीला संपूर्ण बॉलिवूड उपस्थित होतं. मात्र, एका अभिनेत्याला पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. या पार्टीत किंग खान म्हणजेच शाहरुख खान (Shahrukh Khan) पत्नी गौरी खान (Gauri Khan) हिच्यासोबत सामील झाला होता. यादरम्यान सनी देओल आणि शाहरुख खान (Sunny Deol And Shahrukh Khan) यांच्या मैत्रीने सर्वांना हैराण केले. दोघांनी एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून पोझ दिले. या फोटो आणि व्हिडिओंनी सर्वांची मने जिंकली.

व्हिडिओ व्हायरल
या व्हिडिओच्या सुरुवातीला दिसते की, माध्यमांपुढे सनी देओल आणि शाहरुख खान एकत्र येतात. यानंतर ते एकमेकांची गळाभेटही घेतात. तसेच, वेगवेगळे पोझ देतात. सनी पुन्हा शाहरुखची गळाभेट घेतो. यानंतर शाहरुख सनीचा हात पकडून पुढे जातात. हा व्हिडिओ एवढा शानदार आहे की, हा पाहून प्रत्येक चाहता खुश होत आहे. सर्व चाहते याच दिवसाची वाट पाहत होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

तब्बल 30 वर्षांपूर्वी झाली होती दुश्मनी
माध्यमांतील वृत्तांनुसार, 30 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या ‘डर’ (Sunny Deol and Shah Rukh Khan Movie Darr) या सिनेमात शाहरुख खान याला जास्त महत्त्व दिल्यामुळे सनी देओल (Sunny Deol) नाराज झाला होता. यश चोप्रा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘डर’ या सिनेमात सनी देओल नायक, तर शाहरुख खलनायकाच्या भूमिकेत होता. या सिनेमात यश चोप्रा यांनी प्रयोग केला होता, की कोणता मुख्य अभिनेता खलनायक बनला, तर प्रेक्षकांची प्रतिसाद काय मिळतो. तसेच, सनी देओल अशा विचारात होता, की समोर कुणीही असो सिनेमाचा नायक तर तोच आहे, पण सिनेमा जेव्हा रिलीज झाला, तेव्हा सर्वच बदललं. नायकापेक्षा खलनायकाची जास्त चर्चा झाली. हेच सनीला आवडले नाही आणि त्याने अनेक वर्षे शाहरुखपासून अंतर राखले.

शाहरुखने केली ‘गदर 2’ची प्रशंसा
‘डर’ सिनेमापासून सुरू झालेली ही कहाणी आता ‘गदर 2’ सिनेमाने संपवली. रिपोर्ट्सनुसार, सनी देओलने अलीकडेच मुलाखत दिली होती. यामध्ये त्याला शाहरुखविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना तो म्हणाला होता, “गदर 2 पाहिल्यानंतर शाहरुखने फोन केला होता आणि त्याने प्रशंसाही केली आहे.”

शाहरुखचा नवीन सिनेमा (Shah Rukh Khan Jawan)
याव्यतिरिक्त शाहरुख खान याच्या आगामी सिनेमाविषयी बोलायचं झालं, तर शाहरुख ‘जवान’ (Shah Rukh Khan Jawan) या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत नयनतारा, सान्या मल्होत्रा, विजय सेतुपती, योगी बाबू यांसारख्या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. (actor sunny deol shahrukh khan patch up after 30 years jawan gadar 2 actor close in gadar 2 success party)

हेही वाचा-
‘लता मंगेशकर’ नावामुळेच शक्ती कपूरांच्या वडिलांनी त्यांना ‘या’ चुकीसाठी केले होते माफ, रंजक आहे किस्सा
फिरोज खानच्या गाडीला टक्कर मारून ‘विलन’ बनले शक्ती कपूर; काय आहे अभिनेत्याचं खरं नाव?

हे देखील वाचा