राजीव कपूर यांच्याआधी कपूर घराण्यातील ‘या’ दिग्गजांनी घेतलाय जगाचा निरोप


बॉलिवूडमधील सर्वात मोठे खानदान म्हणून ‘कपूर’ घराणे ओळखले जाते. या घराण्याला अगदी पृथ्वीराज कपूर पासून आताच्या रणबीर कपूरपर्यंत या घराण्याने अनेक दशकं प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अनेक वर्ष रसिकांचे मनोरंजन करणाऱ्या या घराण्याने हिंदी सिनेसृष्टीला मोठे कलाकार दिले. याच घराण्यातील नुकताच एक तारा निखळला आहे. ९ फेब्रुवावरीला या घरातील राजीव कपूर यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. राजीव कपूर हे जरी इतर अभिनेत्यांइतके प्रसिद्ध झाले नसले तरी त्यांनी देखील अनेक सिनेमात काम केले होते. आज आपण या लेखात कपूर घराण्यातले असे कलाकार पाहणार आहोत, ज्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे.

ऋषी कपूर :
३० एप्रिल २०२० मध्ये ऋषी कपूर यांचे कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने निधन झाले. ऋषी कपूर यांनी जवळपास दोन दशकं बॉलिवूडवर राज्य केले. त्यांनी त्यांच्या अभिनयाने आणि त्यांच्या वेगळ्या शैलीने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच स्थान मिळवले. कर्ज, दिवाना, चांदणी, बॉबी, नगिना, सरगम, प्रेमरोग, खेल खेल मैं, दामिनी, १०२ नॉट आउट, हम तुम, अग्निपथ, मुल्क आदी एका पेक्षा एक सरस सिनेमांमध्ये त्यांच्या प्रभावी अभिनयाने लोकांचे मनोरंजन केले. त्यांनी अभिनेत्री नितु सिंग यांच्यासोबत लग्न केले. या दोघांच्या जोडीला सर्वत्र परफेक्ट कपल म्हणून ओळखले जायचे. ऋषी कपूर जेव्हा कॅन्सरग्रस्त झाले तेव्हा प्रत्येक क्षण नितु त्यांच्यासोबत होत्या. त्यांना रणबीर कपूर आणि रिधिमा कपूर अशी दोन मुलं आहेत.

शशी कपूर :
७० च्या दशकातील प्रसिद्ध आणि अतिशय देखणे अभिनेते म्हणून शशी कपूर ओळखले जायचे. त्यांनी त्यांच्या भावांचे एवढे मोठे नाव असूनही स्वतःची अशी वेगळी ओळख तयार केली. त्यांनी दिवार, कभी कभी, जब जब फुल खिले, सत्यम शिवम सुंदरम, सुहाग, त्रिशूल, शान, कलयुग, सिलसिला आदी हिट सिनेमांमध्ये काम केले. त्यांनी अनेक सिनेमांमध्ये अमिताभ बच्चन सोबत काम केले, त्यांची ही जोडी रसिकांना खूप भावली. २०१४ साली त्यांना सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्काराने देखील गौरविण्यात आले. ४ डिसेंबर २०१७ मध्ये त्यांचे निधन झाले.

शम्मी कपूर:
शम्मी यांनी त्यांच्या अभिनयसोबतच हटके डान्स शैलीने खूप प्रसिद्धी मिळवली. जवळपास तीन दशकं मोठा पडदा गाजवणारे शम्मी कपूर त्याकाळी तरुणींच्या गळ्यातील ताईत झाले होते. जंगली, तिसरी मंजिल, कश्मीर की कली, ब्रह्मचारी, राजकुमार, जनावर, तुमसा नही देखा, अंदाज, चायना टाऊन, जाने अनजाने आदी ब्लॉकबस्टर सिनेमे दिले. त्यांनी गीता बाली यांच्यासोबत केलेल्या गुपचूप लग्नामुळे ते अधिक चर्चेत आले होते. त्यांनी १४ ऑगस्ट २०११ ला या जगाला अलविदा म्हटले.

राज कपूर :
बॉलिवुडचे शोमॅन म्हणून प्रसिद्ध असणारे दिग्गज अभिनेते राज कपूर यांचे २ जून १९८८ ला निधन झाले. त्यांनी भारतीय सिनेमाला एक नवीन उंची प्राप्त करून दिली. अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शन देखील केले. आवरा, श्री ४२०, मेरा नाम जोकर, संगम, अनारी, बरसात आदी सिनेमात त्यांनी काम केले. त्यांचे आणि नर्गिस यांचे विवाहबाह्य संबंध प्रचंड गाजले होते. राज कपूर यांचे अस्थमाच्या आजारामुळे निधन झाले. त्यांना ३ राष्ट्रीय आणि ११ फिल्मफेयर पुरस्कार मिळाले होते. त्यांचे वयाच्या ६३व्या वर्षी निधन झाले.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

पृथ्वीराज कपूर :
कपूर घरातले पहिले अभिनेते पृथ्वीराज कपूर भारतीय सिनेमाचे आधारस्तंभ म्हणून ओळखले जातात. त्यांनी या इंडस्ट्रीला मोठे करण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्यांनीच पृथ्वी थिएटरची स्थापना केली. मुघले आझम या अतिशय गाजलेल्या सिनेमात त्यांनी केलेली भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यांच्या सिनेसृष्टीतील अमूल्य योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते, तसेच त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देखील मिळाला. १९७२ साली २९ मे रोजी त्यांचे निधन झाले.

हेही वाचा
हिट झालेल्या सिनेमाचे श्रेयही राजीव कपूर यांना मिळाले नाही, वडिल राज कपूर यांनीही दिली नव्हती साथ
शूटिंगदरम्यान राजीव कपूर पडले होते पद्मिनी कोल्हापुरेच्या प्रेमात; राज कपूर यांनी धमकी दिल्यावर तुटले होते दोघांचे नाते
राज कपूर ते दिलीप कुमार या कलाकारांची घरे, तर किंग खान शाहरुखचे असे आहे पाकिस्तान कनेक्शन


Leave A Reply

Your email address will not be published.