Friday, April 19, 2024

चाहत्यांना दिलासा l राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा, पण डॉक्टरांनी केली ‘ही’ विनंती

लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Shrivastv) हे सध्या दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उचपार घेत असून त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात येत होते. बुधवारी दिनांक (१० ऑगस्ट) रोजी जिममध्ये वर्कआउट करताना अचानक बेशुद्ध पडल्याने त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून चाहते त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची बातमी समोर आली आहे. 

गेल्या आठवडाभरापासून कॉमेडियन राजू श्रीवास्तव रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबतच्या अनेक अपडेट समोर येत होत्या. ज्यामध्ये त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता नवीन अपडेट नुसार राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या पुतण्याने त्यांच्या प्रकृतीबद्दलची अपडेट माध्यमांना सांगितली आहे.

यावेळी कुशल श्रीवास्तव यांनी सांगितले की, राजू श्रीवास्तव यांच्या बोटांची हालचाल होत आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीही त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना ते उपचाराला प्रतिसाद देत असून प्रकृती सुधारत असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचेही आवाहन केले आहे. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने त्यांच्या चाहत्यांमध्येही आनंदाचे वातावरण पसरले आहे.

राजू श्रीवास्तव यांनी बॉलिवूडमध्ये तेजाब, मैंने प्यार किया, बाजीगर, मिस्टर आझाद, अभय, बिग ब्रदर, बॉंम्बे टू गोवा अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम करत आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्याचबरोबर त्यांनी टेलिव्हिजन जगतात द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज, शक्तिमान, राजू हाजीर हो, कॉमेडी सर्कस, कॉमेडी का महामुकाबला, नच बलिए, कॉमेडी नाईट्स विथ कपिल, अदालत, द कपिल शर्मा शो या कार्यक्रमांमधूनही तुफान लोकप्रियता मिळवली.

हेही वाचा –खऱ्या आयुष्यात कविताला का घायचं नाही मातृत्वाचा आनंद, मोठे कारण आले…..

आलिया भट्टने शेअर केला रणबीरचा ‘देवा देवा’ व्हिडिओ; म्हणाली, ‘माझ्या आयुष्याच्या…’

मुंबईत गायक कुमार सानूचे नाव घेऊन फसवणूक करायचे लोक, महिलेची झालेली 40 लाखांची फसवणूक

हे देखील वाचा