×

‘अशी कानाखाली देईन ना…’, भडकलेल्या राखी सावंतने ट्रोल करणार्‍यांना दिली धमकी

ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. कधी कपड्यांमुळे तर कधी आपल्या पतीसोबत झालेल्या वादामुळे राखी नेहमीच चर्चेत येत असते. मात्र यावेळी सोशल मीडियावर राखीला ट्रोल केले गेल्याने ती चांगलीच भडकली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेत्री राखी सावंत सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. आपले हॉट आणि बोल्ड फोटो ती नेहमी आपल्या चाहत्यांशी शेअर करत असते. नुकतीच राखी तिची ‘बिग बॉस’मधील मैत्रीण अफसाना खानच्या (Afsana Khan) लग्नात धमाल करताना दिसून आली होती. या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडिओ राखीने शेअर केले होते. ज्यामधील मेहंदीच्या कार्यक्रमाचे फोटो सुद्धा होते. याच फोटोंमुळे अभिनेत्री राखी सावंतला ट्रोल केले गेले होते. ज्यामुळे राखी सावंत खूपच संतापली होती. त्यामुळेच तिने एक व्हिडिओ शेअर करत आपला राग व्यक्त केला आहे.

राखी सावंतने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करत, अफसाना खानच्या लग्नातील फोटो व्हायरल करत राखीला ट्रोल करणार्‍यांवर राग व्यक्त केला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये ती म्हणते की, “मी अफसाना खानच्या लग्नात पहिल्यांदा मेहंदी लावली असे म्हणाल्यामुळे माझे जुने फोटो व्हायरल करत मला ट्रोल करत आहेत. त्यांच्या एक कानाखाली देणार आहे. मनापासून मेहंदी लावणे आणि रडत रडत मेहंदी लावणे यात फरक असतो. अफसानाच्या लग्नात मी मनापासून मेहंदी लावली होती. आणि माझ्या लग्नात मी रडत रडत मेहंदी लावली होती. कारण रितेशने लग्नासाठी एकदा दोनदा नव्हेतर तब्बल चार वेळा नकार दिला होता. नंतर पाचव्या वेळा तो लग्नाला हो बोलला. तेव्हा रडून रडून माझे अश्रू त्या मेहंदीवर पडलेत. मग त्याला काय मेहंदी लावणे म्हणतात का?”

View this post on Instagram

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

राखीच्या या संतापलेल्या व्हिडिओची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे.

हेही वाचा –

Latest Post