Friday, March 29, 2024

‘आरआरआर’ चित्रपटाचा पहिला म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित; ‘फ्रेंडशिप डे’च्या निमित्ताने ‘दोस्ती’ गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला

आज रविवारी (१ ऑगस्ट ) सर्वत्र मैत्री दिन साजरा होत आहे. सगळेजण मित्रांना भेटून हा दिवस मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करताना दिसत आहे. खरंतर मित्र आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग असतात. याच मैत्रीचा जल्लोष साजरा करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

यातच आपल्या सर्वांचा हा ‘फ्रेंडशिप डे’ आणखी जल्लोषात आणि आनंदात साजरा होणार आहे. याचे कारण म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार राम आणि एनटीआर यांचा बहूप्रतिक्षीत चित्रपट ‘आरआरआर’चा म्युझिक व्हिडिओ ‘फ्रेंडशिप डे’च्या मुहूर्तावर प्रदर्शित केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हा या चित्रपटाचा पहिला म्युझिक व्हिडिओ आहे. हे गाणे पाच गायकांनी मिळून गायले आहे. अनिरुद्ध रविचंद्रन, विजय येसुदास, अमित त्रिवेदी, हेमाचंद्रा आणि याजिन निजार यांनी मिळून हे गाणे गायले आहे. तसेच हे गाणे देखील पाच भाषांमध्ये प्रदर्शित केले आहे. तमिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदीमध्ये हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला एमएम किरावानी यांनी कंपोझ केले आहे. (ram charan and jr ntr starrer RRR song dosti released rajmauli share a video)

एसएस राजमौली यांनी हे गाणे शेअर करून ट्विटरवर लिहिले आहे की, “मैत्री दिन साक्षीला आहे. दोन शक्तिवान रामराजू आणि भीमसोबत राहत आहे.” या पोस्टमध्ये त्यांनी यूट्यूबची लिंक देखील शेअर केली आहे. या गाण्याचे बोल रिया मुखर्जी यांनी लिहिले आहेत. हे गाणे एमएम क्रिमद्वारे कंपोझ केले आहे.

‘आरआरआर’ या चित्रपटाच्या कहाणीबद्दल बोलायचे झाल्यास, ही एक पिरिअड कहाणी असणार आहे. यामध्ये दोन स्वातंत्र्य सैनिक कोमाराम आणि अल्लूरी सीताराम राज यांच्यावर आधारित एक काल्पनिक कहाणी आहे. या चित्रपटात एनटीआर ज्युनिअर, राम चरण, अजय देवगण आणि आलिया भट्ट यांसारखे कलाकार दिसणार आहेत. राजमौली यांचा ‘आरआरआर’ हा चित्रपट भारतातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाचे बजेट ४५० कोटीच्या आसपास आहे .कोरोनामुळे सध्या अनेक चित्रपटगृह बंद आहेत. त्यामुळे या चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा चित्रपट प्रदर्शित करण्याची तारीख १३ ऑक्टोबर ठरवली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रियांका चोप्रा ते स्वरा भास्करपर्यंत, बॉलिवूड इंडस्ट्रीतील ‘ही’ रहस्ये वाचून उंचावतील तुमच्या भुवया!

-प्रार्थना बेहेरेच्या ‘आपली यारी’ गाण्याला रसिकांचा तुफान प्रतिसाद; दोन दिवसातच ओलांडला २ मिलियन व्ह्यूजचा टप्पा

-फ्रेंडशिप डे स्पेशल: बॉलिवूडमधील या कलाकारांची मैत्री पाहून तुम्हालाही वाटेल हेवा, करण-काजोलही आहेत यादीत सामील

हे देखील वाचा