Sunday, October 26, 2025
Home साऊथ सिनेमा पँटलेस हुडी घालून जिममध्ये पोहोचली ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदाना; कॅमेऱ्यात कैद झाले तिचे क्यूट एक्सप्रेशन्स

पँटलेस हुडी घालून जिममध्ये पोहोचली ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदाना; कॅमेऱ्यात कैद झाले तिचे क्यूट एक्सप्रेशन्स

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने संपूर्ण देश हादरला आहे. असे असूनही, काही चित्रपट कलाकार नेहमीच्या कामात अडथळा येऊन न देता, आपला दिनक्रम पूर्ण करत आहेत. या कलाकारांमध्ये दाक्षिणात्य सिनेमाची अभिनेत्री रश्मिका मंदानाचाही समावेश आहे. जी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतही जोरात व्यायाम करताना दिसत आहे. अभिनेत्रीने एक दिवससुद्धा व्यायाम करणे सोडले नाही.

रश्मिका मंदाना तिचे व्यायामाचे सत्र अतिशय गंभीरपणे घेते. हेच कारण आहे की, ती दररोज जिममध्ये नक्कीच जाते. नुकतीच अभिनेत्री जिमच्या बाहेर स्पॉट झाली आहे. याशिवाय ती अतिशय कॅज्युअल अवतारात राहणे पसंत करते. म्हणूनच तिचे जिमिंग आउटफिट्सही खूप मस्त असतात. यावेळी ती गुलाबी रंगाच्या हुडीमध्ये दिसली आहे.

रश्मिका मंदाना जिमच्या बाहेर दिसताच, तेथील उपस्थित कॅमेरामॅनने तिचे बरेच फोटो क्लिक केले. यावेळी, रश्मिकाने कॅमेरामॅनकडे पाहिले आणि अशा प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त केली. तिने कॅमेऱ्याकडे बघत अतिशय क्यूट असे एक्सप्रेशन्स दिले.

रश्मिका मंदानाचे गोंडस हसणे, नेहमीच चाहत्यांना तिच्या प्रेमात पाडते. यावेळी पुन्हा अभिनेत्रीची क्यूट स्माईल पाहून, तिचे चाहते वेडे झाले आहेत.

रश्मिका मंदानाने तमिळ, तेलुगु आणि कन्नड चित्रपटांच्या माध्यमातून तिची जबरदस्त ओळख निर्माण केली आहे. ती तिच्या ‘गीता गोविंदम’, ‘डिअर कॉम्रेड’ आणि ‘सुलतान’ या चित्रपटातील भूमिकेसाठी विशेष ओळखली जाते. पण आता ती लवकरच बॉलिवूड विश्वात प्रवेश करणार आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर रश्मिका मंदाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अभिनेत्रीच्या हातात २ मोठे हिंदी चित्रपट आहेत. याशिवाय ती अल्लू अर्जुनच्या पॅन इंडियाद्वारे रिलीझ होत असलेल्या, ‘पुष्पा’ या चित्रपटातही दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जुही चावलाची मुलगी करणार बॉलिवूड पदार्पण? आयपीएल ऑक्शन दरम्यान झाली होती शाहरुख खानच्या मुलासोबत स्पॉट

-जुही चावलाची मुलगी करणार बॉलिवूड पदार्पण? आयपीएल ऑक्शन दरम्यान झाली होती शाहरुख खानच्या मुलासोबत स्पॉट

-आयपीएलमध्ये खुलेआम केले होते किस, का झाले होते दीपिका पदुकोण आणि सिद्धार्थ मल्ल्याचे ब्रेकअप? अभिनेत्रीने केले स्पष्ट

हे देखील वाचा