Thursday, April 25, 2024

रिया चक्रवर्तीकडे एका सामान्य माणसाने मागितली मदत; अभिनेत्रीने ‘अशी’ दिली त्याला प्रतिक्रिया

 

रियाचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये रिया एका सलुनमधून बाहेर पडताना दिसत असून, तिने गुलाबी रंगाचा ऑफ शोल्डर टॉप आणि वेस्ट जीन्स घातली आहे. ती बाहेर आल्यावर तिथे एक व्यक्ती व्हीलचेयरवर बसलेला दिसत होता. तो तिच्याकडे मदत मागत होता, त्यावर तिने ‘बाद मैं बाद मैं’ म्हटले आणि तिथून निघून गेली. तिथे असलेल्या पॅप्पराजींना तिने पोझ देताना सांगितले की, ‘एकाच जागेवर घ्या.’ तिचा हा व्हिडिओ व्हायरल भयानी या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला गेला आहे.

रियाच्या या व्हिडिओवरून तिला सोशल मीडिया ट्रोल केले जात आहे. एकाने कमेंट करत लिहिले, ‘या मुलीला कव्हर करणे आवश्यक आहे का?’, दुसऱ्याने लिहिले, ‘आधी खून केला आणि आता सलुनमध्ये जात आहे.’, अजून एकाने लिहिले, ‘तिला पाहूनच नकारात्मक वाइब्स येतात.’ नुकतीच रिया दिग्दर्शक रुमी जाफरींची मुलगी अल्फीयाच्या मेहेंदीच्या कार्यक्रमात दिसली होती. रिया रुमी जाफरी यांच्या ‘चेहेरे’ सिनेमात अमिताभ बच्चन, इम्रान हाश्मी यांच्यासोबत दिसणार आहे.

रियाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले, तर ती लवकरच रुफी जाफरी यांच्या ‘चेहेरे’ सिनेमात दिसणार आहे. मात्र कोरोनामुळे सिनेमा प्रदर्शित होत नाहीये.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-करीना कपूरने बहीण करिश्मा कपूरसोबत मेजवानीचा लुटला भरपूर आनंद; मात्र नंतर जे झाले…

-कपिल शर्मा अन् भारती सिंगचे ‘बचपन का प्यार’ गाणे ऐकून पळून गेली त्यांची फॅन; पाहा हा मजेदार व्हिडिओ

-काय सांगता! चक्क बर्फाच्या पाण्यात केला त्यांनी रोमँटिक डान्स; बघतच राहिले प्रेक्षक

हे देखील वाचा