Wednesday, May 14, 2025
Home बॉलीवूड अली फझल अली रिचा चड्डा झाले आई-बाबा; गोंडस मुलीचे केले स्वागत

अली फझल अली रिचा चड्डा झाले आई-बाबा; गोंडस मुलीचे केले स्वागत

अली फजल आणि ऋचा चढ्ढा यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आलेले आहेत. अभिनेत्रीने एका मुलीला जन्म दिला आहे. बाळाच्या जन्मानंतर दोन दिवसांनी रिचा आणि अलीने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. 16 जुलै रोजी या जोडप्याला मुलीचा जन्म झाला. संपूर्ण कुटुंब खूप आनंदी आहे.

आनंदाची बातमी शेअर करताना ऋचा चढ्ढा म्हणाली, “आम्हाला हे सांगताना खूप आनंद होत आहे की आमची मुलगी 16 जुलै रोजी आली आहे. मुलगी पूर्णपणे निरोगी आहे. आमचे संपूर्ण कुटुंब खूप आनंदी आहे. आम्हाला इतके प्रेम आणि आशीर्वाद दिल्याबद्दल आम्ही आमच्या हितचिंतकांचे आभारी आहोत.”

एक दिवस आधी, रिचा चड्ढाने सोशल मीडियावर तिच्या बेबी बंपचे फोटो शेअर केले होते. यासोबत तिने भावनिक कॅप्शन लिहिले आहे की, “असे शुद्ध प्रेम जगाला प्रकाशाच्या किरणांशिवाय काय आणू शकते? या अविश्वसनीय प्रवासात माझा सोबती असल्याबद्दल अली फझलचे आभार. रिचानेही रिद बर्मनला या फोटोशूटसाठी बोलावल्याबद्दल आभार मानले.”

ऋचा चढ्ढा आणि अली फजल यांचे २०२२ मध्ये लग्न झाले. याआधी दोघेही अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते. 2012 मध्ये फुकरे चित्रपटाच्या सेटवर दोघेही पहिल्यांदा भेटले होते. तिथून दोघेही एकमेकांच्या जवळ आले. त्यांनी त्यांचे नाते बरेच दिवस गुप्त ठेवले.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अली फजल सध्या वेब सीरिज ‘मिर्झापूर’च्या तिसऱ्या सीझनसाठी चर्चेत आहे. यामध्ये त्याने गुड्डू भैय्याच्या भूमिकेतून पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केले आहे. ही मालिका प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाली. रिचाबद्दल बोलायचे झाले तर ती संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ या मालिकेत दिसली होती. ही मालिका 1 मे 2024 रोजी रिलीज झाली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

रश्मीका मंदानाच्या जवळच्या व्यक्तीचे निधन; सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट शेअर
ऋचा चढ्ढाने प्रेग्नेंसीचे फोटो केले शेअर, पण ‘या’ कारणामुळे कमेंट सेक्शन केले बंद

हे देखील वाचा