‘आमच्या रोजगारावर परिणाम होतोय’, बॉयकॉट ट्रेंडमुळे दिग्गज अभिनेत्रीने व्यक्त केला संताप

0
63
priyanka. kareena and katrina
Photo Courtesy: Instagram/

सध्या बॉलिवूड चित्रपटांवर प्रेक्षकांचा चांगलाच रोश पाहायला मिळत आहे. आमिर खानच्या ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटापासून हा विरोध चांगलाच वाढला आहे. यामुळेच अभिनेता आमिर खानचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला होता. त्यानंतर आलेल्या अनेक चित्रपटांनाही बॉयकॉट करण्याची मागणी केली होती. या विरोधावर आता बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढाने पोस्ट शेअर करत खडेबोल सुणावले आहेत. 

अभिनेत्री रिचा चड्ढाची (Richa Chaddha) ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने लिहिले, “गणेश चतुर्थीच्या 10 दिवसांनंतर मी बाोलत आहे आणि शांत प्रार्थनेने आपण हिंदी चित्रपटसृष्टीत दररोज शूटिंग कसे सुरू करतो… विघ्नहर्ता (भगवान गणेश) याला “रोलिंग गणपती” म्हणतात आणि समाप्त होते. हिंदी चित्रपटसृष्टीला कचरा म्हणणाऱ्या लोकांनी कधी सेटवर जाऊन तिथे काम केलं असेल का, असं मला आश्चर्य वाटतं. लोकांना पाहिलं असेल, त्यांच्या डोळ्यात पाहिलं असेल याबद्दल मला खूप शंका आहे. ”

अभिनेत्री पुढे म्हणाली की “बहिष्काराच्या प्रवृत्तीचा सिनेसृष्टीतील लोकांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. अलीकडच्या काळात लाल सिंग चड्ढा, डार्लिंग्स, रक्षा बंधन आणि ब्रह्मास्त्र यासह अनेक चित्रपटांना बहिष्काराचा सामना करावा लागला. मला विश्वास आहे की लोकांना त्यांच्या रोजगारातून बाहेर काढण्यासाठी पुन्हा एकदा बहिष्काराचे प्रकार आले आहेत, मला विश्वास आहे की या चित्रपटाने प्रचंड नफा कमावला आहे. ही प्रथा तोडली पाहिजे, सुधारित केले पाहिजे आणि अर्थातच बदलले पाहिजे. सर्व काही बदलेल. लवकरच”.

 

View this post on Instagram

 

A post shared by Richa Chadha (@therichachadha)

दरम्यान रिचाच्या या पोस्टवर अभिनेता अली फजलनेही प्रतिक्रिया दिली आहे. रिचा आणि अली लवकरच विवाह बंधनात अडकणार असून त्यांच्या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर

हेही वाचा – ‘या’ कारणमुळे गेले पाच वर्षे कपिल शर्मा आणि अली असगरने पाहिले नाही एकमेकांचे तोंड, घ्या जाणून
‘म्हणून माझा पहिला चित्रपट माझ्यासाठी शाप’, आयुष्मान खुरानाने सांगितलेले कारण ऐकून बसेल धक्का
‘ब्रह्मास्त्र’मध्ये देवची भूमिका रणवीर सिंग साकारणार का? करण जोहर लाइव्ह चॅटमध्ये म्हणाला, ‘आम्ही हिरो…’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here