Friday, March 29, 2024

कधी तुरुंगात भांडी घासायचा ‘आयरन मॅन’ रॉबर्ट डाऊनी, आता प्रत्येक चित्रपटासाठी घेतो कोट्यवधी रुपये

आपले नशीब आपल्या बरोबर असले की ती व्यक्ती आपला वाईट काळ मागे टाकत पुढे जाते. सगळ्यांना चुटकी सरशी हरवणारा आयरन मॅन अर्थातच रॉबर्ट जॉन डाऊनी जूनिअरला, तर तुम्ही ओळखतचं असाल. त्याला हॉलिवूडचा आयरन मॅन आणि टोनी स्टार्क म्हणून ओळखले जाते. रॉबर्टने हॉलिवूडमध्ये चित्रपटाच्या माध्यमातून यशाचे शिखर गाठले. ‘अवेंजर्स’, ‘कॅप्टन अमेरिका सिव्हिल वॉर’, ‘शरलॉक होम्स’ अशा अनेक चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करुन लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांची मने त्याने जिंकली.  आज त्याला पूर्ण जगामध्ये ‘आयरन मॅन’ नावानेच ओळखले जाते.

परंतु हाच ‘आयरन मॅन’ एके काळी फक्त ६ रुपये कमवत होता. तो आता ५० मिनिटांचे ५०० कोटी कमवतो. यशाच्या शिखरावर पोहचलेला रॉबर्ट लहानपणापासून बराच करामती होता. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटले, पण लहान वयातच त्याने तुरुंगाची हवा खाल्ली होती. एवढेच नाही, तर त्याला जीवघेणी व्यसने देखील होती.

रॉबर्टने ५ वर्षांचा असल्यापासूनच अभिनय करायला सुरुवात केली. तो ६ वर्षांचा असताना त्याला त्याच्या बाबांनी मारिजुआना नावाचा एक अंमली पदार्थ खाऊ घातला होता. हा पदार्थ शरीरासाठी खूप हानिकारक असतो. त्यानंतर ८ वर्षांचा होईपर्यंत त्याला देखील अंमली पदार्थांचे व्यसन लागले आणि वयाच्या १६ मध्ये त्याने शिक्षण सोडून अभिनयाकडे लक्ष केंद्रित केले. परंतु नशेच्या व्यसनामुळे तो वादाच्या विळख्यात पडू लागला.

रॉबर्टला अंमली पदार्थांचे व्यसन केल्यामुळे एक वर्षासाठी तुरुंगवास भोगावा लागला होता. त्याला जेव्हा तुरुंगात टाकले तेव्हा त्याला इतर कैदी खूप मारायचे. तो एक स्टार होता, पण त्याच्याबरोबर कैद्यांप्रमाणेच व्यवहार केला जात होता. हा काळ त्याच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता.

तुरुंगात गेल्यानंतर तिथे त्याला भांडी घासायचे काम मिळाले होते. तास भर काम केल्यानंतर या कामासाठी त्याला फक्त ६ रुपये मिळायचे. तुरुंगात असल्याने त्याने ही सर्व कामे निमूटपणे केली.

त्याला तुरुंगात जावे लागल्यामुळे त्याची पत्नी फार चिंतेत होती. तसेच त्याला अंमली पदार्थांच्या सेवनाचे व्यसन असल्याने तिला त्याच्या बरोबर रहायला देखील आवडत नव्हते. त्यामुळे तिने घटस्फोट घेतला. त्यानंतर तो रॉबर्ट सुजेन लेविनला भेटला. तिने त्याच्याबरोबर २००५ साली लग्न केले. परंतु तिने लग्नासाठी एक अट ठेवली होती. ज्यात तिने सांगितले होते की, त्याने व्यसन सोडले, तरच ती त्याच्याशी लग्न करेल. रॉबर्टने तिचे ऐकले आणि त्याने व्यसन सोडून तिच्यासोबत लग्न केले.

लहापणापासूनच त्याने आपल्या आयुष्यात अनेक अडचणींना तोंड दिले आहे. आयरन मॅन या चित्रपटामधून त्याने यशाचे शिखर गाठले. याच चित्रपटामुळे त्याला पहिले घवघवीत यश मिळाले. नशीब कधी आणि कसे बदलेल याचा काहीच अंदाज नसतो असाच प्रकार रॉबर्ट बरोबर घडला आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

बॉलिवूडचे ‘हे’ मोठे सिनेमे ठरले नुसताच फुसका बार, कमाईतून बजेट वसूल करणे देखील झाले मुश्किल

बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्रींनी लग्नानंतर त्यांच्या यशस्वी चित्रपटांच्या करिअरला ठोकला रामराम

प्रायव्हेट जेटमध्ये मांडी घालून बसलेल्या प्रियांका चोप्राचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले, ‘खरी देसी गर्ल’

हे देखील वाचा