Friday, April 19, 2024

करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सिनेमाच्या रिलीझ डेटमध्ये बदल, सिनेमा होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

या नवीन २०२३ वर्षांमध्ये बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांचे सिनेमे प्रदर्शित होणार आहे. अनेक चित्रपटांची प्रतीक्षा तर मागील काही महिन्यांपासून केली जात आहे. या वर्षात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांमध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांचा बहुचर्चित असा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा सिनेमा देखील आहे. या सिनेमाने मागच्या वर्षी घोषणेनंतर मोठा बज तयार केला होता. करण जोहर या सिनेमाच्या माध्यमातून बऱ्याच वर्षांनी दिग्दर्शकाच्या भूमिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांना दिसणार आहे. मात्र या सिनेमाची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी ही बातमी खूपच महत्वाची आहे.

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमाची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांना अजून जरा चित्रपटाची अधिक वाट पाहावी लागणार आहे. एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. दिग्दर्शक करण जोहरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. जेव्हा सिनेमाची घोषणा झाली तेव्हाच हा सिनेमा एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित होणार असे सांगितल्या गेले होते. मात्र आता हा सिनेमा जुलै २०२३ मध्ये प्रदर्शित होईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

करण जोहरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून याबाबदल माहिती देणारी पोस्ट शेअर केली आहे. त्याने त्याच्या पोस्टमध्ये ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर केली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले, “असं म्हणतात की संयमाचे फळ नेहमीच गोड असते. तर या खास कहाणीचा गोडपणा अधिक वाढवण्यासाठी आम्ही खूप प्रेम घेऊन येत आहोत. रॉकी आणि राणीचे परिवार देखील तयार होत आहे. बघा प्रेमाची अनोखी कहाणी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ २८ जुलै २०२३ ला चित्रपटगृहांमध्ये.”

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल का झाले या मागचे कारण जरी समोर आले नसले तरी माहितीनुसार करण जोहरला प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेलवन 2’ सोबत टक्कर घ्यायची नाही. म्हणूनच त्याने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली. मणिरत्नम यांच्या ‘पीएस 2’ में ऐश्वर्या राय बच्चन, चियान विक्रम, कार्ति, तृषा कृष्णन, जयम रवि, सरथकुमार, प्रभु लाल, किशोर, अश्विन, ऐश्वर्या लिक्ष्मी आदी काळकर मुख्य भूमिकेत आहे. तर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ में रणवीर सिंह, आलिया भट्ट, शबाना आजमी, धर्मेंद्र , जया बच्चन हे कलाकार दिसणार आहे.

याआधी आलिया आणि रणवीर यांचा ”गल्ली बॉय’ हा सिनेमा तुफान गाजला होता. आता या सिनेमात पुन्हा एकदा करण जोहरच्या सिनेमातून ही जोडी प्रेक्षकांना दिसणार आहे. या २०२२ या वर्षांमध्ये आलिया भट्टच्या ‘ब्रह्मास्त्र’ने रेकॉर्डब्रेक कमाई केली. रणवीर सिंगचा मागच्या वर्षी रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता, मात्र हा सिनेमा सुपरफ्लॉप ठरला. आता करणच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमाकडून त्याला खूप अपेक्षा आहेत.

 

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
‘हे तर काहीच नाय’ शोमध्ये प्रेक्षकांना रमेश देव यांना अनुभवायची मिळणार शेवटची संधी, निधनापूर्वी लावली होती शोमध्ये हजेरी
चित्रपटांपासून दूर असूनही बक्कळ पैसा कमावते शमिता शेट्टी; पण मिळवू शकली नाही बहीण शिल्पासारखं यश

हे देखील वाचा