Sunday, December 8, 2024
Home अन्य कठीण काळ! कशी देतेय अभिनेत्री कोरोनाशी झुंज, सांगताना रूबीना लागली रडू

कठीण काळ! कशी देतेय अभिनेत्री कोरोनाशी झुंज, सांगताना रूबीना लागली रडू

टीव्हीमधली प्रसिद्ध अभिनेत्री रुबीना दिलैक याच महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह आली होती. ही माहिती अभिनेत्रीने स्वतः इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. ‘बिग बॉस १४’ विजेती रुबीनाने शनिवारी (१५ मे) एक भावनिक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये ती कोरोना लढाई लढत असतानाचे वर्णन करताना रडताना दिसली आहे. रुबीनाने हा व्हिडिओ यूट्यूबवर शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये रुबीना दिलैक जलद अँटीजेन टेस्टमध्ये, कोरोना पॉझिटिव्ह कशी आली हे सांगताना दिसत आहे. जेव्हा तिला हे सांगितले गेले, तेव्हा रुबीनाची पहिली प्रतिक्रिया होती,”काय, पॉझिटिव्ह? पॉझिटिव्ह? व्वा. एक महिन्यानंतर मी माझा प्लाझ्मा दान करण्यासही सक्षम होऊ शकते.” त्यानंतर रुबीना त्या ठिकाणी रवाना झाली, जिथे ती १७ दिवस स्वत: ला विलगीकरणात ठेवणार असते.

रुबीना दिलैक आपल्या कुटुंबासह शिमला येथे राहत आहे. या व्हिडिओत ती कोरोनाची लक्षणे काय, याबद्दल अभिनेत्रीने चाहत्यांनाही माहिती दिली आहे. तिला ताप आला होताच, तिने स्वत: ला वेगळे ठेवल्याचेही सांगितले आहे. ‘शक्ति अस्तित्व के अहसास की’ फेम रुबीनाने, तिच्या चाहत्यांना घरी राहून सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. बाहेर जाताना सर्व खबरदारी घ्या. जर कोणास सर्दी किंवा तापाची लक्षणे आढळली असतील, तर प्रत्येकास स्वत: ची तपासणी करण्यास तिने सांगितले आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, त्या जेवणाच्या थाळीचाही व्हिडिओ शेअर केला आहे, जे तिचे आई आणि बहिणीने तिला दिले होते. सोबतच स्वतःला भाग्यवानही मानले आहे.

व्हिडिओमध्ये रूबीना म्हणते की, “मी स्वत: ला भाग्यवान समजते. मला हे बर्‍याच काळापासून आपल्या सर्वांबरोबर शेअर करायची होती. मला नशीबवान वाटते की, मला एक चांगले कुटुंब मिळाले, प्रेमळ आणि काळजी करणारा नवरा मिळाला, आणि पालकांचे प्रेम आणि समर्थन मिळाले आहे. माझ्या बहिणी आश्चर्यकारक आहेत, आणि शेवटी मी माझ्या चाहत्यांचेही आभार मानू इच्छिते, ज्यांनी माझी खूप काळजी घेतली. मी संदेश आणि प्रार्थना वाचत होते. ज्यांनी माझ्याकरता प्रार्थना केली.” असे म्हणत रुबीना रडण्यास सुरुवात करते, जे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नेहा कक्करने साजरा केला आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस; सोशल मीडियावर शेअर केले गोड फोटो

-अगं बाबोव! आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय गाण्यात उर्वशीने घातला होता ‘इतक्या’ कोटींचा ड्रेस; किंमत वाचून तुम्हीही घालाल तोंडात बोटे

-चक्रीवादळामुळे अभिनेत्री दीपिका सिंगच्या घरापुढे पडले झाड, मग काय अभिनेत्रीने झाडासमोरच लावले जोरदार ठुमके; एकदा पाहाच

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा