×

टिव्हीवरील सोज्वळ अभिनेत्रीच्या बिकीनी लूकमधील फोटोंनी चुकवला चाहत्यांच्या काळजाचा ठोका

लोकप्रिय टिव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक (Rubina Dilaik) तिच्या स्टाईलिश आणि बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असलेली रुबिना अनेकदा आपले बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना घायाळ करत असते. सध्या टिव्ही मालिकेत सोज्वळ भूमिका साकारणाऱ्या रुबिनाने तिचे बोल्ड फोटो शेअर करत सर्वांनाच घायाळ केले आहे. तिच्या या फोटोंची सध्या सोशल मीडिया जगतात चांगलीच चर्चा रंगली आहे. या व्हायरल फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे. 

रुबिना दिलैक ही टीव्हीवरील लोकप्रिय आणि स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे. रुबिना आपल्या स्टायलिश आणि बोल्ड स्टाइलने सोशल मीडियावर नेहमीच लोकांना मोहित करत असते . टेलिव्हिजनची सोज्वळ अभिनेत्री असलेल्या रुबिनाने वीकेंडला असे काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे . या व्हायरल फोटोंमध्ये रुबिना बिकिनीमध्ये खूपच मादक दिसत आहे. हिरव्या रंगाच्या स्टायलिश बिकिनीमध्ये रुबिना स्विमींग पूलमध्ये किलर स्टाईल दाखवताना दिसत आहे. याशिवाय तिच्या टोन्ड फिगरवरही सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. काही दिवसांपूर्वी नेटकऱ्यांनी रुबिनाला तिच्या वाढत्या वजनामुळे ट्रोल केले होते. ज्याबद्दल रुबिनानेही तिचे मतही मांडले होते.

View this post on Instagram

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)

आता रुबिनाने तिचे बोल्ड आणि फिट फिगरचे फोटो शेअर करत नेटकऱ्यांना चांगलाच धक्का दिला आहे. तत्पुर्वी  नुकतेच रुबीनाने भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या ‘द खतरा’ कार्यक्रमातही भाग घेतला होता. ज्याचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून तिने भारतीच्या कार्यक्रमात खूपच धमाल केल्याचे लगेच दिसत आहे. अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच पलाश मुच्छालच्या अर्ध चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. आता सर्वांनाच तिच्या या आगामी चित्रपट पदार्पणाची प्रतीक्षा आहे. मात्र सध्या तरी तिच्या या बिकीनी लूकनेच सगळ्यांना फिदा केल्याचे पाहायला मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post