×

काय सांगता! रविवारी सुट्टी मागितली म्हणून ‘या’ टीव्ही अभिनेत्रीला चक्क मालिकेतून दाखवला बाहेरचा रास्ता

आठवडाभर काम करणारे सर्वच नोकरदार वर्ग रविवारची आतुरतेने वाट बघत असतात. संपूर्ण आठवड्याचा कामाचा आलेला शीण काढण्याच्या दिवस म्हणून रविवार ओळखला जातो. हा दिवस सर्वच काम करणाऱ्या लोकांसाठी हक्काची सुट्टी असते. मात्र ज्या लोकांना या दिवशी सुट्टी नसते आणि त्यांना या दिवशी सुट्टी पाहिजे असेल आणि त्यांना ही सुट्टी नाकारत थेट कामावरून काढण्यात आले तर? ऐकायला विचित्र वाटते ना? पण हे खरे आहे. रविवारी सुट्टी हवी होती म्हणून चक्क एका अभिनेत्रीला मालिकेतून काढून टाकण्यात आले. हा प्रकार घडला आहे अभिनेत्री शुभावी चौकसीसोबत.

View this post on Instagram

A post shared by Shubhaavi Choksey Official (@shubhaavi)

एका मुलाखतीमध्ये शुभावी चौकसीने याबद्दल खुलासा केला आहे. तिने सांगितले आहे की, “रविवारी सुट्टी मागितल्यामुळे मला दोन शोमधून काढून टाकण्यात आले. मला निर्मात्यांचे टेन्शन माहित आहे. मात्र मला सुट्टीची गरज होती, कारण मला माझ्या मुलाची काळजी घ्यायची होती. शुभावी चौकसीने सांगितले की, “मला रविवारचा दिवस माझ्या कुटुंबासोबत आणि मैत्रमैत्रिणींसोबत घालवायचा असतो. इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना देखील आठवड्यातून एकदा सुट्टी मिळाली पाहिजे. त्यातही रविवारी सुट्टी मिळाली तर अजूनच चांगले होईल. मी माझ्या करिअरमध्ये रविवारी देखील काम केले.”

View this post on Instagram

A post shared by Shubhaavi Choksey Official (@shubhaavi)

पुढे शुभावी म्हणाली की, “मला मुलगा असल्याने माझी इच्छा असते की, रविवारचा दिवस मी माझ्या नवऱ्यासोबत आणि मुलासोबत घालवू इच्छिते म्हणून मी एका दिवसाची सुट्टी घेऊ इच्छिते. अनेक निर्मात्यांनी माझी मागणी मान्य करत मला रविवारी देखील सुट्टी दिली आहे.” शुभावी चौकसीने आतापर्यंत ‘कसौटी ज़िंदगी के 2’, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘तीन बहुरानियां’, ‘कहानी घर घर की’ आदी मालिकांमध्ये काम केले असून, सध्या ती ‘बड़े अच्छे लगते हैं 2’ मालिकेत काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post