Monday, June 17, 2024

अनन्या पांडे आणि अक्षय कुमार यांमधील रोमान्सच्या अफवांना लागला पूर्णविराम; ‘ही’ माहिती आली समोर

अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) यांच्या आगामी चित्रपटावर अफवांचे संकट ओढवले आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघे अभिनेते एकमेकांसोबत रोमान्स करत असल्याची अफवा एका लोकप्रिय मीडिया पोर्टलने पसरवली होती. मात्र, या अफवांवर आता पूर्ण विराम मिळाला आहे. अनन्या पांडे आणि अक्षय कुमार यांच्या आगामी चित्रपटाचा संदर्भ देत एका लोकप्रिय मीडियाने आपल्या लेखद्वारा पोर्टलद्वारा दोन्ही अभिनेते एकमेकांसह रोमान्स केल्याबद्दल सांगितले गेले होते. परंतु, यामध्ये काही तथ्य नसून हि निव्वळ अफवा असल्याचे समोर आले आहे.

या मीडिया लेखाने दोन्ही अभिनेत्यांमधील वयोमर्यादावर भाष्य केले होते. पण, एका जवळच्या सूत्राने या केवळ अफवा असून दोन्ही कलाकार फक्त सहकारी आहेत आणि यामध्ये रोमांसचा समावेश नाही अशे स्पष्टपणे सांगितले आहे.

सिने चाहत्यांनीदेखील सोशल मीडियावर या लेखवर प्रतिक्रिया देऊन हा लेख एक अफवा आहे आणि यामध्ये काही तथ्य नाही असे म्हणत आहेत. तसेच, लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म “ट्विटरवर” चाहते अक्षय कुमार आणि अनन्या पांडे या दोघांच्याही समर्थनार्थ उभे राहिले. एका जवळील सूत्राने हे दोन्ही कलाकार चित्रपटात फक्त सहकाऱ्यांची भूमिका साकारत होते, आणखी काही नाही असे स्पष्ट केले आहे.

दोन्ही अभिनेत्यांमधील वयाचा उल्लेख केल्याने चाहत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. तसेच, त्यांनी लेखाला अफवा म्हणत क्षेत्रात वय हा फक्त एक आकडा आहे असे देखील मत मांडले. (Rumors of romance between Ananya Pandey and Akshay Kumar have come to an end)

आधिक वाचा-
कतरिना कैफ आणि विजय सेतुपतीच्या रोमँटिक सीनने वेधले लक्ष, ‘मेरी ख्रिसमस’चा जबरदस्त ट्रेलर रिलीज
Jaya bachchan : ‘नव्या संसदेतील शौचालयं इतकी घाणेरडी आहेत की…’, जया बच्चन यांची संसदेतील वॉशरुमबद्दल तक्रार

हे देखील वाचा