सई लोकूरने शेअर केला साडीमधला व्हिडिओ; ‘तितली’ गाण्यावर पाहायला मिळाल्या अभिनेत्रीच्या वेड लावणाऱ्या अदा


अभिनेत्री सई लोकूर सोशल मीडियावर खूप सक्रिय राहते. सतत आपले फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून, ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. ट्रॅडिशनल लुक असो वा वेस्टर्न असो, ती प्रत्येक लुकमध्ये तितकीच सुंदर दिसते. तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक नजर टाकल्यास आपल्या सहज लक्षात येईल की, सई प्रत्येक आऊटफिट किती उत्तमरीत्या कॅरी करते. नुकताच सईने तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

सई लोकूरने तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, जो सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री साडीमध्ये दिसली आहे. यात तुम्ही पाहू शकता की, अभिनेत्री ‘चेन्नई एक्सप्रेस’ मधील ‘तितली’ या गाण्यावर अभिनय करत आहे. अभिनय करताना सईच्या अदा अगदी पाहण्यासारख्या आहेत.

या व्हिडिओ शिवाय तिने या लूकमधले काही फोटो देखील पोस्ट केले आहेत. ज्यात अभिनेत्री कमालीची सुंदर दिसत आहे. गजरा, दागिने आणि कपाळावर टिकली एकंदरीत सईचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. साडीवरील तिच्या या पोस्ट्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. शिवाय नेटकरी यावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद व्यक्त करत आहेत. (sai lokur shared video in saree goes viral on internet)

सईच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने हिंदी व मराठी दोन्ही सिनेसृष्टीतून आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. ‘कुछ तुम कहो कुछ हम कहे’, ‘पकडा गया’, ‘मिशन चॅम्पियन’ या चित्रपटांमध्ये तिने बालकलाकार म्हणून काम केले आहे. ती विशेषतः ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’, आणि ‘किस किस को प्यार करू’ या चित्रपटासाठी ओळखली जाते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मैं तो खड़ी थी आस लगाए…’, रितिका श्रोत्रीच्या निरागसतेने नेटकऱ्यांना पाडली भुरळ

-कंगना रणौत करणार इंदिरा गांधींवर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन; म्हणाली, ‘माझ्यापेक्षा इतर कोणीही…’

-सुरेश रैनाला बॉलिवूड कलाकार आवडत नाहीत? आपल्या बायोपिकसाठी या दोन साऊथ कलाकारांची सुचवली त्याने नावे


Leave A Reply

Your email address will not be published.