Wednesday, April 17, 2024

‘सैराट’ फेम सूरज पवार चौकशीसाठी पोलीस ठाण्यात दाखल, गंभीर गुन्ह्यात झाली सहा तास चौकशी

गेल्या काही दिवसांपासून सैराट फेम अभिनेता सुरज पवार (Suraj Pawar) चांगलाच चर्चेत आला आहे. सुरज पवारवर एक फसणुकीच्या गुन्ह्यात सहआरोपी असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामुळे तो चांगलाच अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. मंत्रालयात नोकरीला लावतो असे सांगून पैसे उकळल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर लावण्यात आला होता. त्यानंतर आता चौकशीसाठी सुरज पवार राहुरी पोलिस ठाण्यात हजर राहिल्याची माहिती समोर आली आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की,  काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यात एका फसवणुकीच्या प्रकरणात सुरज पवारचा सहभाग असल्याची माहिती समोर आली होती. मंत्रालयात नोकरीला लावतो असे सांगून पाच लाख रुपयांची मागणी संशयितांकडून कऱण्यात आली होती. या प्रकरणात नेवासा तालुक्यातील महेश वाघडकर यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांकडून तीन संशयितांना अटक करण्यात आली. ज्यांनी या प्रकरणात सुरज पवारचाही सहभाग असल्याचे सांगितले होते. या प्रकरणात त्याला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते.

त्यानंतर अभिनेता सुरज पवारला सोमवारी पुन्हा सुरज पवारला न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे, दरम्यान अभिनेता सुरज पवारने सैराट चित्रपटात आर्चीच्या भावाची म्हणजेच प्रिन्स बाबाची भूमिका साकारली होती. चित्रपटातील त्याच्या या डॅशिंग भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते. त्याचबरोबर त्याला या भूमिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. त्याचबरोबर सुरज पवारने ‘पिस्तुल्या’, ‘फॅंन्ड्री’, ‘सैराट’ सारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा- म्हणून ‘या’ पाकिस्तानी अभिनेत्याला करता आले नाही बॉलिवूड पदार्पण, मिथुन चक्रवर्तीचा मुलगा होता कारण?
जिने केस लढवली तिलाच पटवली! अभिनेता जॉनी डेपची नवी लवस्टोरी चर्चेत
अभिनेत्री अलका कुबल आणि प्रिया बेर्डे अडचणीत, दहा वर्षापुर्वीच्या खटल्यात भरावा लागणार दहा लाखांचा दंड

 

 

हे देखील वाचा