Rajasthan | सलमान खानला मोठा दिलासा, हायकोर्टात होणार काळवीट शिकार प्रकरणी सुनावणी

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला (Salman Khan) काळवीट शिकार प्रकरणात राजस्थान उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने २१ मार्च रोजी सलमानच्या हस्तांतरण याचिकेवर सुनावणी करताना, ती मान्य केली आहे. आता सर्व प्रकरणांची एकत्रित सुनावणी हायकोर्टात होईल, त्यामुळे सलमान खानला आता पुन्हा पुन्हा कोर्टात यावे लागणार नाही, असा निर्णय हायकोर्टाने दिला.

सलमान खान काळवीट शिकार प्रकरणात जामिनावर बाहेर आहे. याआधी सलमान खानच्या वकिलाने काळवीट शिकार प्रकरणाशी संबंधित सर्व अपील उच्च न्यायालयात हस्तांतरित करण्यासाठी याचिका दाखल केली होती. ज्यावर उच्च न्यायालयात सातत्याने सुनावणी सुरू होती. हायकोर्टात सरकारी वकिलांच्या वतीने उत्तर सादर करण्यासाठी न्यायालयाकडून वेळ मागून घेण्यात आला, त्यानंतर न्यायालयाने २१ मार्च रोजी सुनावणी निश्चित केली गेली. (salman khan cases related to deer hunting will now be heard in high court)

याआधी सत्र न्यायालयात प्रलंबित असलेल्या सलमानशी संबंधित अपील, उच्च न्यायालयात ट्रान्सफर करण्याच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी सातत्याने पुढे ढकलण्यात आली होती. काळवीट शिकार प्रकरणी आरोपी सलमान खानला अधीनस्थ न्यायालयाने ५ वर्षांची शिक्षा सुनावली असून, अवैध शस्त्रास्त्र प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

सलमान खानचे वकील हस्तीमल सारस्वत आणि रेखा सांखला यांनी संबंधित अपील सत्र न्यायालयाकडून उच्च न्यायालयात हस्तांतरित करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याच सरकारी वकिल गौरव सिंग यांनी उत्तर सादर करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला होता. जो न्यायालयाने मान्य केला आणि सरकारी वकिलांना उत्तर सादर करण्यासाठी वेळ दिला.

याशिवाय तिसऱ्या प्रकरणात कांकणी गावात दोन काळवीटांची शिकार केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. चौथ्या प्रकरणात सलमानवर बेकायदेशीर शस्त्रास्त्रांचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्यामध्ये तो आधीच निर्दोष सुटला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post