बॉलिवूडचा ‘दबंग’ खान आहे तब्बल ‘इतक्या’ कोटींचा मालक; प्रायव्हेट याट अन् महागड्या गाड्यांची लागलीय लाईन


ग्लॅमर इंडस्ट्रीकडे जेव्हा आपण बघतो, तेव्हा सर्वात आधी आपल्याला कलाकारांचे आलिशान आयुष्य आणि त्यांची संपत्ती भुरळ घालते. अतिशय लक्झरी जीवन जगणाऱ्या या कलाकारांची संपत्ती जर आपण पाहिली, तर आपले डोळे नक्कीच पांढरे होतील एवढ्या कोटींची त्यांची संपत्ती असते. त्यात जर अनेक वर्ष या क्षेत्रात काम करणारा जुना आणि सुपरस्टार असेल, तर विचारायलाच नको. संपत्तीच्या बाबतीत बॉलिवूडमध्ये सर्वात पुढे असणाऱ्या कलाकारांपैकीच एक अभिनेता म्हणजे ‘दबंग’ सलमान खान होय. १०० कोटी क्लबचा कर्ताधर्ता म्हणून सलमान ओळखला जातो.

हात लावेल तो सिनेमा हिट याची आजच्या घडीची सर्वात मोठी खात्री असणारा हा कलाकार म्हणजे एकमेव सलमान खान. ‘मैंंने प्यार किया’ या सुपरहिट सिनेमातून सलमान खानने १९८९ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आज पदार्पणाच्या ३२ वर्षानंतर सलमानची जादू कायम आहे. या एवढ्या मोठ्या करिअरमध्ये त्याने तुफान यश, प्रसिद्धी, लोकप्रियता आणि पैसा कमावला आहे. विशेष म्हणजे त्याने त्याचे नाव म्हणजे एक ब्रँड म्हणून तयार केले आहे. मागील काही वर्ष बघता सलमान आणि हिट हे जणू समीकरणच बनले आहे. सलमानबद्दल आज लहानात लहान गोष्ट देखील सर्वांना माहित आहे. मात्र, आज आम्ही तुम्हाला त्याच्या संपत्तीबद्दल सांगणार आहोत. एका रिपोर्टनुसार, तो १९५० कोटी इतक्या संपत्तीचा मालक आहे.

सलमान हा कौटुंबिक व्यक्ती आहे. आजही तो त्याच्या संपूर्ण परिवारासोबत मुंबईमध्ये गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. या घराची किंमत १६ कोटींपेक्षा अधिक आहे. यासोबतच सलमानचा गोराई जवळ ५ बीएचके फ्लॅट आहे. सर्व सोयीसुविधांनी युक्त असे त्याचे हे घर असून यात जिम, स्विमिंग पूल, एक मिनी सिनेमागृह आदी गोष्टी आहेत. समुद्र किनाऱ्यावर असल्याने या घराची किंमत तब्बल ७५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. याशिवाय त्याचे पनवेल येथे एक फार्महाऊस देखील आहे. या फार्महाऊसवर जाणे सलमान खानला खूप आवडते. कित्येक एकरांमध्ये हे फार्महाऊस पसरले आहे. या फार्महाऊसची किंमत तब्बल ८० कोटी रुपये आहे. या फार्म हाऊसवर सलमान खानला अनेकदा स्पॉट केले जाते.

सलमानच्या कमाईतील सर्वात मोठा हिस्सा तो जाहिरातींमधून कमावत असतो. त्याच्याकडे आलिशान घरं, अनेक कार, बाईक आणि मुख्य म्हणजे त्याच्याकडे त्याचे स्वतःचे एका खासगी याट आहे. या याटची किंमत जवळपास ३ कोटी असल्याचे सांगितले जाते. २०१६ साली त्याने त्याच्या वाढदिवशी हे खरेदी केले होते.

Photo Courtesy: YouTube/ScreenGrab/
India Sonic

सलमान खान महागड्या गाड्यांचा बाईक्सचा आणि सायकलचा मोठा शौकीन आहे. सलमान खानकडे रेंज रोव्हर, बीएमडब्ल्यू X6, ऑडी R8, टोयोटा लँड क्रूझर, ऑडी RS7, लेक्सस LX470, मर्सिडीज बेंज सारख्या महागड्या कार त्याच्याकडे आहेत. शिवाय त्याच्याकडे एक सायकल असून तिची किंमत ४ लाख ३२ हजार रुपये इतकी आहे. सोबतच त्याच्याकडे ५ बाईक्स आहे.

Photo Courtesy: YouTube/ScreenGrab/
India Sonic

सलमान खानचे बिंग ह्युमन नावाचे एक फाऊंडेशन देखील आहे. त्याच्या या ब्रँडबद्दल सर्वांनाच माहित आहे. या ब्रँडच्या नावाने त्याने कपड्यांचा देखील ब्रँड सुरू केला आहे. या फाऊंडेशनमध्ये जवळपास त्याची २३५ कोटी रुपयांची गुंतवणूक असल्याचे सांगितले जाते. याशिवाय त्याचे एका प्रॉडक्शन हाऊस देखील आहे.

सलमान एका सिनेमासाठी ५० कोटी रुपये फी घेतो. शिवाय तो बिग बॉसच्या एका भागासाठी १२/१४ कोटी रुपये चार्ज करतो. लवकरच सलमान ‘अंतिम’ सिनेमात झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

सावळ्या रंगामुळे जरीना वहाब यांना मिळत नव्हते चित्रपट; देव आनंद यांच्या सिनेमात काम करून पाडली प्रेक्षकांवर छाप

-‘सुंदर अन् सुशील!’ अक्षय कुमारची अभिनेत्री चित्रांगदाने साडीतील फोटो शेअर करत लावलं नेटकऱ्यांना याड

-टायगर श्रॉफची बहीण कृष्णाने सांगितला तिचा फिटनेस मंत्र; म्हणाली, ‘सातत्य हीच तुमच्या यशाची…’


Leave A Reply

Your email address will not be published.