Friday, May 24, 2024

धक्कादायक! लोकप्रिय भोजपूरी अभिनेत्रीची झाली फसवणूक, घातला लाखोंचा गंडा

प्रसिद्ध भोजपुरी सिनेमापासून छोट्या पडद्यापर्यंत संभावना सेठ(Sambhavna Seth)हिने  स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे. संभावना सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिच्या ब्लॉगच्या माध्यमातून स्वतःशी संबंधित छोट्या-छोट्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. अलीकडेच संभावना सेठचा नवीन व्हिडिओ समोर आला आहे. संभावना घराचे रिनोवेशन करत आहे. या घराच्या इंटेरिअर डिझायनिंगसाठी तिने एका कॉन्ट्रॅक्टरशी संपर्क साधला होता. मात्र संबंधित ठेकेदारने तिची फसवणूक केली. संभावना तिच्या नवीन घराच्या कॉन्ट्रॅक्टरविरुद्ध पोलिस केस नोंदवण्याबद्दल बोलत आहे. यासोबतच ठेकेदाराने आपली लाखोंची फसवणूक केल्याचेही संभावना सेठ सांगत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतं आहे.

संभावना सेठ सध्या यूट्यूबच्या प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहे. दरम्यान, संभावना सेठने तिच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर नवीनतम व्हिडिओ शेअर केला आहे. या ब्लॉग व्हिडिओमध्ये भावना नवीन घराच्या कॉन्ट्रॅक्टरविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदवण्याबाबत बोलताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये संभावना सेठ आणि त्यांचे पती अविनाश द्विवेदी नवीन घराच्या कॉन्ट्रॅक्टरावर राग काढताना दिसत आहेत. घराच्या इंटेरिअरचं घराच्या इंटेरिअरचं सर्व काम त्याच्यावर सोपवल्यानंतर आणि कामाचे पैसे आधीच दिल्यानंतरही आता तो ठेकेदार कामावर येत नसल्याची तक्रार तिने केली. संभावनाने याविषयी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला.

कामाचे पैसे आधीच घेतल्यानंतरही ठेकेदार विविध कारणं देऊन काम टाळत असल्याचं तिने म्हटलंय. कधी स्वत: आजारी असल्याचं सांगून तर कधी कामगार नाही असं म्हणत तो टाळाटाळ करत असल्याची तक्रार संभावनाने केली. “एखाद्यावर विश्वास तरी कसा करायचा? त्या ठेकेदारावर पूर्ण विश्वास ठेवून मी त्याला आधीच पैसे दिले आणि आमची फसवणूक करून तो पळून गेला. संबंधित व्यक्ती जर कधी तुम्हाला भेटला आणि त्याने असा दावा केला की संभावनाच्या घरी मी इंटेरिअरचं काम केलंय, तर अजिबात विश्वास ठेवू नका”, असं ती या व्हिडीओत म्हणाली. संभावनाचा पती अविनाशसुद्धा या व्हिडीओत राग व्यक्त करताना दिसतो.

याप्रकरणी संबंधित ठेकेदाराविरोधात तक्रार दाखल करण्याचा विचार दोघं करतात. मात्र नंतर विचार करत ठेकेदाराकडून काहीही झालं तरी घराचं काम पूर्ण करून घेणार, असं म्हणतात. संभावना सेठचा युट्यूबवर मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करत ठेकेदाराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला.(sambhavna seth filed police complaint against her new house contractor watch video)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

‘आंटी तर फुल्ल फॅशेनमध्ये;’ म्हणत, मलायाका अरोराची ट्रोलर्सने उडवली खिल्ली
हॉट! अभिनेत्री हुमा कुरेशीने फ्लॉन्ट केला सिंपल लुक, नारंगी रंगात दिसतेय ऑरेन्ज

हे देखील वाचा