Friday, April 19, 2024

आर्यन खान क्रूझ अं’मली पदार्थ प्रकरणात तपास करणाऱ्या समीर वानखेडेंची हकालपट्टी

मुंबई क्रूझ अं’मली पदार्थ प्रकरणात आज नवा ट्विस्ट समोर आला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची आर्यन खान प्रकरणातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आर्यन खान अं’मली पदार्थ प्रकरणी समीर वानखेडे यांच्यावर आठ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप असून, याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. आता वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय सिंग यांच्या नेतृत्वाखाली एक एसआयटी स्थापन करण्यात आली आहे, जी आर्यन खान प्रकरणासह इतर चार प्रकरणांची चौकशी करेल. जे वानखेडे हाताळत होते.

त्याचवेळी समीर वानखेडे यांनी माध्यमांना सांगितले की, “सीबीआय किंवा एनआयए सारख्या केंद्रीय एजन्सीद्वारे त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी मी स्वतः उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याआधारे दिल्लीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आली असून, ही एसआयटी आता आर्यन प्रकरण आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा जावई समीर खान यांचीही चौकशी करणार आहे. मला कुठूनही काढण्यात आलेले नाही. मी त्या प्रकरणांचा तपास अधिकारी नव्हतो. मी माझ्या जागीच आहे.”

महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपानंतर वानखेडे मोठ्या वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. विशेष म्हणजे आर्यनच्या खटल्यातील एनसीबीचा साक्षीदार प्रभाकर सैल याने त्यांच्या रेकॉर्डवर आणि केसेस हाताळण्यावर प्रश्न उपस्थित केले होते.

समीर वानखेडे यांना मुंबई क्रूझ अं’मली पदार्थ प्रकरणाच्या चौकशीतून काढून टाकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांची प्रतिक्रिया आली आहे. नवाब मलिक यांनी ट्वीट केले की, “समीर वानखेडे यांना आर्यन प्रकरणासह ५ खटल्यांमधून हटवण्यात आले आहे. एकूण २६ प्रकरणे आहेत ज्यांची चौकशी करणे आवश्यक आहे. ही फक्त सुरुवात आहे… ही व्यवस्था साफ करण्यासाठी अजून बरेच काही करावे लागेल आणि आम्ही ते करू.”

गेल्या आठवड्यात त्यांच्यावर टीकेचा भडका उडाला असताना, एनसीबीने “निर्दोष सेवा रेकॉर्ड”चे कारण देत वरिष्ठ अधिकाऱ्याचे जाहीरपणे समर्थन केले होते. यासोबतच एजन्सीने उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग यांच्या नेतृत्वाखाली अंतर्गत तपासही सुरू केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘या’ मराठी अभिनेत्रींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या चाहत्यांना दीपावलीच्या शुभेच्छा

-पारंपारिक वेशभूषेत ‘या’ मराठमोळ्या लावण्यवतींनी दिल्या दिपावलीच्या शुभेच्छा! पाहा फोटो

-रितेश भैय्याचा अंदाजच लई भारी! बच्चे कंपनीसोबतचा व्हिडिओ शेअर करत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

हे देखील वाचा