मुलगी आयरासोबत पाण्यात मस्ती करताना दिसली अभिनेत्री संजीदा शेख; व्हिडिओ होतोय व्हायरल


‘क्या होगा निम्मो का’ मालिकेतून 2005 साली टेलिव्हिजन दुनियेत प्रवेश करणारी अभिनेत्री म्हणजे संजीदा शेख. तिने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. त्यामुळे तिची लोकप्रियता गगनाला भिडली आहे. सोशल मीडियावर देखील तिची तगडी फॅन फॉलोविंग आहे. तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये संजीदा तिची मुलगी आयरा अली आणि त्यांच्या कुत्र्यासोबत मस्ती करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. (Sanjeeda Sheikh was seen having fun in the water with daughter)

संजीदाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती तिच्या मुलीसोबत नदी किनारी मस्ती करताना दिसत आहे. त्यांचा कुत्रा देखील तिथे खेळताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून असे वाटतं आहे की, संजीदा तिच्या परिवारासोबत सुट्ट्यांवर गेली आहे. संजीदा तिच्या मुलीच्या खूप जवळ आहे. ती नेहमीच तिच्या मुलीसोबतचे क्यूट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

या व्हिडिओमध्ये संजीदा लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तसेच आयरा स्विमिंग सूटमध्ये दिसत आहे. आयरा खूपच क्यूट आहे. सोशल मीडियावर तिच्या फोटोंवर संजीदाचे चाहते भरभरून कमेंट्स करत असतात. आयराचा जन्म सरोगसीद्वारे झाला आहे.

संजीदाने 2020 साली दोन वेबसीरिजमध्ये काम केले आहे. तिने ‘तॅश’ आणि ‘काली कुही’ या वेब सीरिजमध्ये काम केले आहे. तिने केवळ टेलिव्हिजनवर नाही, तर चित्रपटात देखील काम केले आहे. तिने अमिताभ बच्चन यांच्या 2003 मध्ये आलेल्या ‘बागबान’ या चित्रपटात काम केले आहे. तिने ‘कयामत’, ‘क्या दिल मैं है’, ‘एक हसीना थी’, ‘इश्क का रंग सफेद’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ओ पिया’, म्हणत ‘शालू’ने शेअर केला व्हिडिओ; काळ्या साडीमध्ये पाहायला मिळाल्या वेड लावणाऱ्या अदा

-हॉट व्हिडिओ शेअर करत मराठमोळी ऋतुजा बागवे म्हणतेय, ‘…माझ्यात तो टॅलेंट नाही’

‘क्रेझी किया रे’, प्रिया बापटच्या दिलखुलास स्मितवर चाहते झाले फिदा


Leave A Reply

Your email address will not be published.