हिरव्या पानांत… पानात ग… पाहा संस्कृती बालगुडेचे हिरव्या रंगाच्या ड्रेसमधील मनमोहक फोटो…


झी मराठीच्या ‘पिंजरा’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली आणि लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे ‘संस्कृती बालगुडे’. संस्कृती सध्या जरी चित्रपट मालिकांमधून आपल्याला दिसत नसली तरी ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती नेहमी तिच्या हॉट आणि ग्लॅमरस फोटोंसाठी चर्चेत असते . तिचे वेगवेगळ्या वेषभूषेतले, अनेक फोटो ती सतत सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

नुकतेच तिने तिच्या नवीन फोटोशूटमधील काही निवडक फोटो अकाऊंटवरून पोस्ट केले आहे. हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये आणि साध्या मेकअपमध्ये संस्कृती गजबची सुंदर दिसत आहे. तिने हे फोटो पोस्ट करतांना लिहिले, “हिरव्या पानांत, हिरव्या पानांत… पानात ग… पानात ग…”

संस्कृती तिच्या नवीन फोटोंमध्ये अतिशय सोज्वळ आणि आकर्षक दिसत आहे. तिचे हे फोटो पाहून सर्वच तिच्या नक्की प्रेमात पडतील. या फोटोंवर संस्कृतीच्या फॅन्सने भरभरून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. सोबतच अनेक कलाकार देखील तिच्या फोटोंना कमेंट्स करताना दिसत आहे.

संस्कृतीने ‘सांगतो ऐका’ या सिनेमातून मराठी चित्रपटांमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती निवडुंग, शिव्या, एफयु अशा अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांना दिसली. संस्कृतीचा शेवटचा प्रदर्शित झालेला सिनेमा म्हणजे ‘सर्व लाइन व्यस्त आहेत’.

लवकरच संस्कृती ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी!’ या सिनेमात दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा राज ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाला. या सिनेमात संस्कृती बालगुडे सोबतच शुभंकर तावडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, ,राधिका हर्षे – विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के अशी तंगडी कलाकार मंडळी आहे.  तर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत अभिनेता पुष्कर श्रोत्री दिसणार आहे. वैभव जोशी यांचे गीतलेखन आणि अवधून गुप्ते संगीत दिग्दर्शन करत आहेत.


Leave A Reply

Your email address will not be published.