बॉलिवूड अभिनेत्रीचा विचित्र खुलासा! सेटवरून चोरायची साड्या, सांगितली त्यामागची मजबुरी


बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra) ​​तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. तिने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. सान्या मल्होत्राने अलीकडेच असा खुलासा केला आहे, ज्यावर कुणाचा विश्वासही बसणार नाही. तिने चित्रपटाच्या सेटवरून साड्या चोरल्या आणि त्यातली एक परिधान करून मित्राच्या लग्नातही हजेरी लावली. याचा खुलासा खुद्द सान्या मल्होत्राने एका मुलाखतीदरम्यान केला आहे.

सान्या मल्होत्राने मुलाखतीत सांगितले की, “लॉकडाऊननंतर मी ‘मीनाक्षी सुंदरेश्वर’चे शूटिंग करत होते. सेटवर परत आल्याने आणि कॅमेऱ्याला फेस करून मला खूप आनंद झाला. मीनाक्षीच्या पात्रासाठी मी साडी नेसायची, जे मला खूप आवडते. माझ्याकडे अजूनही त्या साड्या आहेत, कारण मी त्या सेटवरून चोरल्या होत्या.” यासोबतच सान्याने असेही सांगितले की, ती एका मैत्रिणीच्या लग्नातही त्यांच्यापैकी एक परिधान करून गेली होती. (sanya malhotra stole sarees from sets of meenakshi sundareshwar know here why)

अभिमन्यू दासानीसोबत केलंय काम
‘मीनाक्षी सुंदरेश्वर’मध्ये सान्या मल्होत्राने अभिमन्यू दासानीच्या पत्नीची भूमिका साकारली होती. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट खूप पसंत केला गेला. या चित्रपटाचे लेखन विवेक सोनी यांनी केले असून, त्यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात सान्या आणि अभिमन्यूच्या लग्नानंतरच्या लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपची कहाणी अतिशय सुंदरपणे दाखवण्यात आली आहे.

सान्या मल्होत्राचे चित्रपट
‘मीनाक्षी सुंदरेश्वर’पूर्वी सान्या शेवटची ‘लुडो’मध्ये दिसली होती. या चित्रपटात तिने आदित्य रॉय कपूरसोबत स्क्रीन शेअर केली होती. आता ती ​​’सॅम माणेकशॉ’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती विकी कौशलसोबत दिसणार आहे. याशिवाय ती ‘लव्ह हॉस्टेल’ या क्राईम-थ्रिलर चित्रपटाचाही एक भाग आहे.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!