यालाच म्हणतात भाईची क्रेझ, लग्न झालेले असूनही ‘या’ अभिनेत्रीने सलमानला घातली लग्नाची मागणी


बॉलिवूड अभिनेता सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कैफने नुकतेच अभिनेता विकी कौशलसोबत लग्नबंधनात अडकले आहे. आता सलमान खान कधी लग्न करणार असा प्रश्न देखील चाहत्यांना पडला आहे. या सगळ्यांतच एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री असलेल्या अनिता हसनंदानीने तिचे लग्न झाले असूनही सलमान खानला प्रपोज केले आहे. सध्या अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, सलमान यावर काय प्रतिक्रिया देणार याची सर्वांचं उत्सुकता आहे.

अनिता हसनंदानी आणि रोहित रेड्डी टीव्ही इंडस्ट्री मधील खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय कपल मानले जाते. त्यांच्यामधील असलेले प्रेम आणि केमिस्ट्रीमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. अनिता आणि रोहित यांनी २०१३ ला लग्न केले. २०२१ ला या दोघांना एक मुलगा देखील झाला. सध्या ते दोघं आई-वडील झाले असून ते त्यांचे पॅरेंटिंग एन्जॉय करत आहे. अनिताने आई झाल्यानंतर तिच्या कामांमधून ब्रेक घेतला असून, ती तिच्या मुलासोबत सर्व वेळ घालवत आहे. परंतु आता सोशल मीडियावर अनिताचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती बॉलीवूडच्या दबंग खानला सलमान खानला लग्नासाठी प्रपोज करताना दिसत आहे. एवढेच नाही तर या व्हिडिओमध्ये अनिताने तिच्या नवऱ्याला सॉरी देखील म्हटले आहे.

अनिता हसनंदानीने हा व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. ज्याच्या मध्ये खूप स्पेशल अंदाजामध्ये सलमान खानला प्रपोज करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खानचे खूप फोटोज लावले असून, ती लहान मुलासारखे बोलताना दिसत आहे. ती म्हणते की, “मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. अनिताचा हा व्हिडिओ इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत १ लाखापेक्षा जास्त प्रेक्षकांनी पाहिले असून, त्यावर भरभरून प्रतिक्रिया येत आहेत.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अनिताने लिहिले आहे, “सॉरी रोहित रेड्डी ती असे म्हणते की मला यावर्षी एक प्रामाणिक रिल बनवायचे होते.’ या व्हिडिओवर सलमान खानच्या फिमेल चाहत्या वर्गाने प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सने तर असे देखील लिहिले आहे की, ‘ती सलमान खान सोबत लग्न करणार; तर एकाने लिहिले, “मी सलमान खानची खूप मोठी चाहती आहे तुझा हा व्हिडीओ पाहून मला हेवा वाटत आहे. तर दुसऱ्या चाहत्याने लिहिले की, “तो माझा आहे आणि मी त्याच्याशी लग्न करणार आहे.” अनिता हसनंदानीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिने सध्या कामामधून ब्रेक घेतला आहे. तिने मागील वर्षी नागीण ४ आणि नागीण ५ मध्ये काम केले होते. पण तिला खरी ओळख ‘ये है मोहब्बते’ या मालिकेद्वारे मिळाली.

हेही वाचा-

‘आर्या २’ वेब सिरीजचे पोस्टर शेअर करत सलमान खानने केले सुष्मिता सेनचे कौतुक

एका चापटीने बदलवले होते हिंदी चित्रपटसृष्टीतील राज कपूर यांचे नशीब, कमी वयातच मिळाली ‘शोमॅन’ ओळख

हे कसं काय! शाहरुख अन् सलमान नव्हे, तर ‘हा’ ठरला २०२१च्या लिस्टमध्ये सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता


Latest Post

error: Content is protected !!