Sunday, March 23, 2025
Home अन्य सपना चौधरीच्या व्हिडीओ वर झालाय व्ह्यूवजचा पाऊस! पहा कोणता आहे ‘हा’ व्हिडीओ

सपना चौधरीच्या व्हिडीओ वर झालाय व्ह्यूवजचा पाऊस! पहा कोणता आहे ‘हा’ व्हिडीओ

सुप्रसिद्ध डान्सर सपना चौधरी ही अनेक स्टेज शोज मधून आपल्याला तिची कला सादर करताना दिसत असते. सध्या तिचा एक डान्स व्हिडीओ व्हायरल होतोय. आपण म्हणाल कोरोना काळात असा कोणता स्टेज शो केला आहे? आणि परवानगी तरी कशी मिळाली? कारण सपना चा डान्स पाहण्यासाठी तर हजारोंनी गर्दी उसळते. पण जरा थांबा सपना चा हा डान्स व्हिडीओ फार जुना आहे. परंतु आता गेल्या काही दिवसांपासून तो फार व्हायरल होत आहे.

सेलिब्रिटींना तर समोर जितकं ओळखत नाहीत तितकं सोशल मीडियावर फॉलो करतात. त्यांच्या बारीक हालचालींवर त्यांच्या चाहत्यांची नजर असते. आणि अशात जर ही सेलिब्रिटी सपना चौधरी असेल तर मग विचारायलाच नको. तिचे फोटो, तिचे व्हिडीओ हे सतत चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनलेले असतात.आपल्याकडे व्हिडीओ नवा की जुना हे पाहिलं जातं नाही तो फक्त व्हायरल होतो. आणि नेमकं हेच सपनाच्या बाबतीत झालं आहे.

या व्हिडीओ मध्ये सपना आपल्याला पांढऱ्या रंगाच्या ड्रेस मध्ये डान्स करताना दिसते. तर गाणं आहे ‘तेरी आंखो का यो काजल’ या गाण्याच्या प्रत्येक तालावर सपना ज्या पद्धतीने डान्स करताना दिसतेय. ते पाहता उपस्थितांची काय अवस्था झाली असेल याचा फक्त विचारच करू शकता. लोकांना हा तिचा डान्स इतका आवडला की ते तिच्यावर पैशांचा पाऊस पाडू लागले. सपनाचा हा व्हिडीओ आतापर्यंत ७ कोटी लोकांनी पाहिला असून त्याचे व्ह्यूज अजूनही वाढतच आहेत. सपनाचा हा व्हिडीओ २०१८ मध्ये त्रिमूर्ती कॅसेट्स या युट्युब चॅनल ने अपलोड केला होता.

बिग बॉस 11 मध्ये दिसलेल्या डान्सर सपना चौधरीची देशभर फॅन फॉलोइंग आहे. ती जिथे जिथे जाते तिथे तिला पाहणा लोकांची गर्दी जमते. सपना चौधरीने आतापर्यंत हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश या राज्यात स्टेज परफॉर्मन्स दिले आहेत.

हे देखील वाचा