×

आपल्या एकापेक्षा एक सुपरहिट गाण्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सपना चौधरीचे आवडते गाणे माहिती आहे का?

हरियाणातील प्रसिद्ध डान्सर आणि गायिका असणारी सपना चौधरी सतत आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे मीडियामध्ये गाजताना दिसते. आपल्या अदा, लटके झटके आणि मादक नजरेने ती सतत तिच्या फॅन्सला घायाळ करत असते. सपनाने आज तिच्या प्रतिभेच्या आणि मेहनतीच्या जोरावर तिने तिची पॅन इंडिया ओळख तयार केली. आज सपना चौधरी नाव जरी उच्चारले तरी तिचे डान्स प्रोग्राम डोळ्यासमोर येतात. पूर्वी फक्त हरियाणा आणि आसपासच्या परिसरात लोकप्रिय असणाऱ्या सपनाने आज जागतिक स्तरावर ओळख मिळवली आहे. आजपर्यंत सपनाचे अनेक डान्स व्हिडिओ किंवा डान्स शो प्रसिद्ध झाले आहेत. मात्र यासर्वांमधे सपनाचे नक्की आवडते गाणे कोणते असा प्रश्न अनेकांना पडत असेल, आज आम्ही या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत.

View this post on Instagram

A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary)

सध्या सपनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधून तिने सर्वांना तिला नेहमीच विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. सपनाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने निळ्या रंगाचा अतिशय सुंदर आणि आकर्षक ड्रेस घातला असून, कानात मोठमोठे कानातले घातले आहे. तिच्या या लूकने तिच्या फॅन्सला चांगलेच वेड लावले आहे. सपनाने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, “खूप लोकं मला विचारतात की, तुला तुझे कोणते गाणे आवडते? मात्र मी सांगू इच्छिते की, माझे गाणे माझ्या मुलांसारखे आहे, त्यामुळे मी माझ्या गाण्यांमध्ये भेदभाव करू शकत नाही.”या व्हिडिओमध्ये सपना ‘बात मैंने साची लागे, बोल तेरे मीठे मीठे’ हे तिचे सुपरहिट गाणे गाताना दिसत आहे. स्टेजवर परफॉर्मन्स देणाऱ्या सपनाचे अनेक चाहते तिच्या नावाने ओरडताना दिसत आहे. सध्या सपनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary)

सपना सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असून ती सतत तिच्या फॅन्सच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असते. तिच्या प्रत्येक पोस्ट वाऱ्यासारख्या व्हायरल होतात. सपनाने बिग बॉसमुळे खूप प्रसिद्धी आणि लोकप्रिय झाली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post