मालदीवमध्ये साराचे ऑरेंज बिकिनीमध्ये हॉट आणि बोल्ड फोटोशूट, नजर हटणार नाही असा फोटो!


कमी काळामध्ये बॉलिवूडमध्ये आपली ओळख तयार करणारी सारा अली खान गेल्या काही दिवसांपासून आपल्या नवनवीन फोटो मार्फत पुन्हा चर्चेचा विषय ठरत असते. सारा गेल्या काही वर्षांपासून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. केवळ सैफ अली खानची मुलगी इतकीच तिची ओळख नाही, तर आपल्या अभिनयातून स्वतःची विशेष ओळख निर्माण करण्यात देखील ती तितकीच यशस्वी ठरली आहे. फार कमी वेळात आपले वेगळे स्थान आणि ओळख निर्माण करण्यासाठी तिने पुरेपूर प्रयत्न केला आहे, त्यात ती यशस्वी सुद्धा झाली आहे.

साराचे फोटोशूट काही दिवसांपासून चर्चेत आले आहेत. अलिकडेच सारा मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद करायला गेली होती. त्यावेळी तिची आई अमृता आणि भाऊ इब्राहिम सुद्धा तिच्यासोबत होते. मालदीवमध्ये शूट केलेले काही सुंदर फोटो ती सतत चाहत्यांच्या भेटीला घेऊन येत असते. त्यातले तिचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घालतात.

साराने नुकताच आपला एक बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यात तिच्या ग्लॅमरस अंदाजाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. हा फोटो भगव्या कलरच्या बिकिनीमध्ये तिने शूट केला असून ती आकर्षक अशी पोज देताना दिसत आहे. फोटोसोबतच तिने मजेदार कॅप्शनचा देखील त्यात उल्लेख केला आहे. ज्यात ती म्हणते की, ‘व्हिटॅमिन सीचा तुमचा डेली डोस.’ हा फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल होत असून, लाखो चाहत्यांनी या फोटोला पसंती दर्शविली आहे.

सारा आपल्या परिवारासोबत नेहमीच दर्जैदार वेळ व्यतीत करताना दिसते. ज्या ज्या ठिकाणी ती जाते तिकडचे सर्वच फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. मग ते मालदीवचा फोटो असो व एखाद्या दर्ग्यातील. मध्यंतरी तिने तबला वाजवतानाचा सुद्धा एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्या व्हिडिओला सुद्धा चाहत्यांनी चांगलीच दाद दिली होती.

साराच्या व्यक्तिगत आयुष्याप्रमाणेच तिच्या प्रेमप्रकरणाचीही चर्चा सध्या जोरात सुरू आहे. ती मध्यंतरी कार्तिक आर्यनच्या प्रेमात वेडी झाली होती असे काहींचे म्हणणे होते. तर या दोघांचे रिलेशनशीप असल्याच्या चर्चांना उधाण देखील आले होते. आता तर ती साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडाच्या प्रेमात पडली असल्याचे देखील बोलले जात आहे. काही दिवसापूर्वी त्या दोघांचा एक फोटो देखील व्हायरल झाला होता.

साराच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं, तर तिने केदारनाथ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. त्यावेळी तिच्यासोबत अभिनेता सुशांत सिंग राजपूत हा मुख्य भूमिकेत होता. अलीकडेच तिचा ‘कुली नंबर १’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तिच्यासोबत वरून धवनने मुख्य भूमिका साकारली आहे. याव्यतिरिक्त लवकरच ते अक्षय कुमार आणि धनुष यांच्यासोबत ‘अतरंगी रे’ या चित्रपटात देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बिकीनीत फोटो पाहायचे असेल तर केवळ मौनी रॉयचेच! पाहा मौनीच्या घायाळ करणाऱ्या अदा

-क्या बात! नोरा फतेही बरोबर थिरकले चिमुकलीचे पाय, ‘दिलबर’ गाण्यावर केला अफलातून डान्स

-‘मिल्की’ गाण्यावर सपना चौधरीने लावले ठुमके! गाण्यातील अदा पाहून चाहतेही झाले दंग


Leave A Reply

Your email address will not be published.