वजन कमी करायचंय? साराने व्हिडिओ शेअर करून सांगितला मार्ग; कधीकाळी अभिनेत्रीचे होते ९६ किलो वजन


कलाकारांना या ग्लॅमर जगात टिकून राहण्यासाठी अतिशय मेहनत घ्यावी लागते. त्यांच्याकडे येणाऱ्या भूमिकांनुसार त्यांना स्वतःमध्ये अनेक बदल करावे लागतात. कधी वजन वाढवावे लागते, कधी कमी  करावे लागते. आपल्या सर्वांनाच माहित आहे की, वजन वाढणे सोपे असते. मात्र, ते कमी करणे खूपच जास्त कठीण. असे असले, तरीही कलाकार हे त्यांच्या व्यायामाच्या संकल्पामुळे आणि चिकाटीमुळे हे अशक्य काम ते अगदी सहज करतात. कलाकार नेहमी त्यांच्या रफ एँड टफ वर्कआऊटचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करतच असतात. त्यांचे हे व्यायाम पाहून भल्याभल्याना घाम फुटेल. मात्र, कलाकार ते अगदी सामान्यपणे करतात. (sara ali khan shared workout video)

आजच्या पिढीची लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या सारा अली खानने देखील नुकताच तिचा वर्कआऊट व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले, “वेक अप, जम्प अप, पुश अप, हेड अप, बर्न अप, लेवल अप.”

आज जरी सारा सडपातळ आणि फिट दिसत असली, तरीही ती चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी ९६ किलोची होती. मात्र, अपार मेहनतीने तिने तिचे अधिकचे वजन कमी केले. आता साराने तिचा वर्कआउट व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्यासारख्या अनेकांसाठी वजन कमी करण्याचा एक मार्ग सुचवला आहे.

साराने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ती तिची बॉडी शेपमध्ये आणण्यासाठी प्रचंड मेहनत करताना दिसते. काही तासांपूर्वी पोस्ट केलेल्या या व्हिडिओला लाखो लाईक्स आले आहेत. व्हिडिओमध्ये सारा फिट राहण्यासाठी भरपूर घाम गळताना दिसत आहे. सरांचे चित्रपटांमध्ये येण्याआधीच फोटो पाहिले, तर आपल्या लक्षात येईल साराने स्वतःला फिट करण्यासाठी किती मेहनत घेतली. साराच्या या व्हिडिओवर फॅन्ससोबतच कलाकार देखील कमेंट्स करताना दिसत आहेत.

माध्यमांतील वृत्तानुसार, चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी सारा पीसीओडी (PCOD) नावाच्या आजाराने ग्रस्त होती. त्यामुळेच तिचे वजन ९६ किलो झाले होते. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी तिने तिचे वजन कमी केले होते. सारा आनंद एल राय यांच्या ‘अतरंगी रे’ चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि धनुष यांच्यासोबत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.