Latest Posts

‘माझी सेटवरची नवी मैत्रीण…’, म्हणत ‘तिला’ मायेने गोंजारताना दिसली ‘कारभारी लयभारी’ फेम अनुष्का सरकटे


झी मराठी चॅनलवर काही दिवसांपूर्वी आलेली ‘कारभारी लयभारी’ ही नवीन मालिका टीव्ही जगात धुमाकूळ गाजवत आहे. यात मुख्य भूमिकेत निखिल चव्हाण आणि अनुष्का सरकटे झळकत आहेत. या दोघांची जोडी आणि अभिनय प्रेक्षकांकडून चांगलाच पसंतही केला जात आहे. अभिनेत्री अनुष्का सरकटेला तिच्या भूमिकेसाठी खूप प्रेम मिळत आहे. याशिवाय अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. सतत आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिच्या पोस्ट्स चाहत्यांकडूनही बऱ्याच पसंत केल्या जातात. आता नुकताच अनुष्काने शेअर केलेला एक व्हिडिओ तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

हा व्हिडिओ अनुष्काने मालिकेच्या सेटवरून शेअर केला आहे आणि यात ती मालिकेतील तिच्या लूकमध्येच दिसत आहे. इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये अनुष्कासोबत तिची नवीन मैत्रीणही दिसत आहे. आता तुम्हाला वाटत असेल की, ती एखादी मुलगी असेल. मात्र तिची ही नवीन मैत्रीण मुलगी नसून एक गाय आहे. होय, या व्हिडिओमध्ये अनुष्का एका गाईसोबत दिसली. इतकेच नव्हे, तर ती गाईला मायेने गोंजारतही आहे.

हा व्हिडिओ शेअर करत अनुष्काने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “माझी सेटवरची नवी मैत्रीण, मनू. हिला बघून मला माझ्या आज्जीची आठवण येते.” सोबतच तिने ‘प्रेमआणिमाया’ हे हॅशटॅग देखील दिले आहे. तिच्या चाहत्यांनी या व्हिडिओवर खूप प्रेम व्यक्त केले आहे. (see karbhari laybhari fame anushka sarkates new friend on set)

अनुष्काच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने आत्तापर्यंत तीन मालिका केल्या आहेत. ‘कारभारी लयभारी’ ही तिची तिसरी मालिका. या आधी तिने ‘मी तुझीच रे’ आणि ‘लक्ष्मीनारायण’ या मालिकांमध्ये काम केले होते. यातील लक्ष्मीनारायण मालिकेतील तिच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. यात तिने लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोन भुमिका केल्या होत्या. ज्याला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘इंडियन आयडल १२’मध्ये अरुणिता कांजिलालचा परफॉर्मन्स पाहून सोनू कक्कर झाली इंप्रेस; दिली ‘ही’ खास भेट

-अनुराग कश्यपच्या मुलीने बॉयफ्रेंडसोबत साजरी केली नात्याची पहिली ऍनिवर्सरी; बोल्ड व्हिडिओ होतोय व्हायरल

-क्रिती सेननचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल प्रेरित; सोबतच ‘या’ सत्याचाही केला तिने उलगडा


Latest Posts

spot_imgspot_img

Don't Miss