Friday, March 29, 2024

अर्रर्र! राखी- मिका ते कॅटरिना- राणी, ‘या’ बॉलिवूड कलाकारांचे ऊप्स मोमेंट; पाहून कोणालाही वाटेल लाज

चित्रपटसृष्टीतील छोट्या- छोट्या गोष्टीही कॅमेऱ्याच्या नजरेतून सुटू शकत नाहीत. प्रत्येक क्षण टिपून तो चाहत्यांपर्यंत पोहोचत असतो. यात काही संस्मरणीय क्षण, काही भावनिक क्षण किंवा रोमँटिक क्षण असतात. त्याचप्रमाणे, अशा काही गोष्टी कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत, ज्यामुळे कलाकारांना ऊप्स मोमेंटचा सामना करावा लागतो. बॉलिवूड विश्वातील अशाच काही विचित्र ऊप्स मोमेंटबद्दल जाणून घेऊया, जे कॅमेऱ्याच्या नजरेत आले आणि कलाकारांना ऊप्स मोमेंटचा सामना करावा लागला.

मल्लिका शेरावत आणि विवेक ओबेरॉय
‘किस्मत लव पैसा दिल्ली’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मल्लिका शेरावत आणि विवेक ओबेरॉय अशा अंदाजात दिसले होते की, चाहते गोंधळून गेले होते. प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी दोघांनीही एकाच मोठ्या आकाराच्या टी-शर्टमध्ये स्वतःला फिट केले होते. या विचित्र ड्रेस आयडियामुळे प्रेक्षकांनी त्यांची खिल्ली उडवली होती.

अनिल कपूर आणि अनु मलिक
हा फोटो चित्रपटसृष्टीतीलच एका कार्यक्रमातील आहे. अनेकदा अशा कार्यक्रमामध्ये कलाकार एकमेकांना मिठी मारून आणि हात धरून भेटतात. अशाच एका इव्हेंटमध्ये अनिल कपूर आणि अनु मलिक एकमेकांना मिठी मारत होते, पण काही वेळात तो फोटो क्लिक झाला, ज्यामुळे आपल्याला काहीतरी वेगळंच समजतं. फोटोमध्ये असे दिसते की, अनु मलिक अनिल कपूरच्या ओठांवर किस घेणार आहेत.

मिका सिंग आणि राखी
गायक मिका सिंगच्या वाढदिवसाच्या पार्टीतील या फोटोने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवून दिली होती. २००६ मध्ये मिकाने राखीला तिच्या बर्थडे पार्टीचे आमंत्रणही दिले होते. स्टेजवर केक कापल्यानंतर राखीने मिकाला स्वत:च्या हाताने जेवण वाढले. यानंतर अचानक मिकाने राखीला जबरदस्तीने किस करायला सुरुवात केली. खूप प्रयत्न करूनही राखीला मिकापासून सोडवता आले नाही. मिकाच्या या कृतीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

प्रियांका चोप्रा
बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा एका कार्यक्रमात पोहोचली होती. यासाठी तिने पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि काळ्या रंगाचा स्कर्ट परिधान केला होता. मात्र, स्टेजवर चढताच प्रियांकाचा स्कर्ट जाळीदार दिसत होता. त्यामुळे तिला ऊप्स मोमेंटला सामोरे जावे लागले होते.

राणी मुखर्जी आणि कॅटरिना कैफ
अभिनेत्री राणी मुखर्जी आणि कॅटरिना कैफ या दोघीही काही कार्यक्रमात उपस्थित होत्या. यादरम्यान, दोन्ही अभिनेत्री एकमेकांना भेटायला गेल्या, पण काही कारणास्तव कॅटरिना राणीच्या ओठांच्या इतकी जवळ आली की, राणीला तिचा चेहरा मागे खेचावा लागला.

फोटो पाहून असे दिसते की, कॅटरिना तिला किस करण्यासाठी पुढे आली असेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तारक मेहता’च्या जेठालालने वाढवली स्पॅनिश पत्रकाराची लोकप्रियता, फोटो शेअर करताच ट्विटरवर वाढले फॉलोव्हर्स

-सोनू सूदला भेटण्यासाठी चाहत्याने बिहारपासून केला सायकलवर प्रवास, अभिनेत्याने फोटो शेअर करून मानले आभार

-अक्षय कुमारने ‘अतरंगी रे’चे मोशन पोस्टर्स केले शेअर, धनुष-साराच्या भूमिकेचा झाला खुलासा

हे देखील वाचा